सांगलीत निरीक्षणगृहातील चार अल्पवयीन मुली पळाल्या

सांगलीत निरीक्षणगृहातील चार अल्पवयीन मुली पळाल्या

सांगली - सांगली-मिरज रस्त्यावरील सुंदराबाई शंकरलाल मालू मुलींच्या निरीक्षणगृहातील चार अल्पवयीन मुली संधी साधून पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दुपारी पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली. विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. येथील रेल्वेस्थानक, बसस्थानक परिसरासह विविध ठिकाणी शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. 

याबाबतची माहिती अशी, की सांगली-मिरज रस्त्यावर मुला-मुलींचे निरीक्षणगृह आहे. मुलींच्या निरीक्षणगृहात सद्यस्थितीत दहा मुली होत्या. दुपारी जेवण झाल्यानंतर तेथील सहायक महिला काही कामानिमित्त बाहेर गेल्या. अधीक्षकांसह अन्य कर्मचारी कार्यालयात होते. 

लक्ष ठेवणारे कुणी नसल्याचे पाहून तीन मुली कोणालाही न सांगता पसार झाल्या. त्या चार मुली सुभाषनगर (मिरज), सांगलीवाडी, निमणी, पलूस येथील आहेत. मुली बेपत्ता झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काहींच्या पालकांनी सुधारगृह गाठले. त्यानंतर निरीक्षणगृहाच्या अधीक्षिका स्वाती पाटील यानी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार शोधाशोध सुरू आहे. 

दरम्यान, येथे अनेक वर्षांपासून मुली बेपत्ता होण्याच्या घटना घडल्या आहेत. त्याठिकाणी असणारे पोलिस कर्मचारी रजेवर असल्याने त्यांच्या बदली पोलिस देण्यात आले नव्हते. याबाबतही पोलिसांना पत्र पाठविणार असल्याचे स्वाती पाटील यांनी सांगितले.

मुलींच्या निरीक्षणगृहातून दुपारी पावणेबाराच्या सुमारास चार मुली बाहेर गेल्या असाव्यात. तातडीने एका मुलीच्या घरी चौकशी करण्यात आली. मात्र, सारे जण रिक्षातून गेल्याचे सांगण्यात आले. त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
- स्वाती पाटील,
प्रभारी अधीक्षिका, निरीक्षणगृह

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com