चौदा गावांना "स्मार्ट ग्राम' पुरस्कार 

दौलत झावरे
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

राज्यातील गावांचा शाश्‍वत विकास होण्यासाठी सरकारकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यात लोकसहभागातून उपलब्ध नैसर्गिक साधनांचा वापर करून पर्यावरणाचा समतोल राखणे, त्यातून समृद्ध ग्राम निर्माण करणे असे उपक्रम राबविण्यात येतात. त्यात पर्यावरण संतुलित ग्राम योजनेत बदल करून सरकारने स्मार्ट ग्राम योजना सुरू केली आहे.

नगर : जिल्ह्यातील चौदा गावांचा "स्मार्ट ग्राम' म्हणून विकास करण्यात येणार आहे. सरकारच्या स्मार्ट ग्राम योजनेत जिल्ह्यातील चौदा तालुक्‍यांमधून प्रत्येकी एक अशा एकूण चौदा गावांची तालुकास्तरीय समित्यांनी निवड केली आहे. या चौदा गावांना प्रत्येकी दहा लाखांचे बक्षीस 26 जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

 जाणून घ्या - लव्ह के लिए कुछ भी... शिक्षिकेनं विद्यार्थ्याला पटवलं अन.. 

राज्यातील गावांचा शाश्‍वत विकास होण्यासाठी सरकारकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यात लोकसहभागातून उपलब्ध नैसर्गिक साधनांचा वापर करून पर्यावरणाचा समतोल राखणे, त्यातून समृद्ध ग्राम निर्माण करणे असे उपक्रम राबविण्यात येतात. त्यात पर्यावरण संतुलित ग्राम योजनेत बदल करून सरकारने स्मार्ट ग्राम योजना सुरू केली आहे.

ग्रामपंचायती विभागणी

या योजनेसाठी गावांची निवड करताना पाच हजार लोकसंख्येपेक्षा मोठ्या ग्रामपंचायती, शहरालगत असणाऱ्या ग्रामपंचायती, पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायती, आदिवासी, पेसा ग्रामपंचायती व उर्वरित ग्रामपंचायती अशी विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार या ग्रामपंचायतींना त्यांच्या क्षमतेनुसार गुणांकन करण्यात आले.

मोठ्या प्रमाणावर सहभाग
यामध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. या ग्रामपंचायतींमध्ये तालुकास्तरीय समितीने पाहणी करून गुणांकन केले. गुणांकनात सर्वांत जास्त गुण असलेल्या 25 टक्के ग्रामपंचायती निवडण्यात आल्या. समितीने 25 टक्के निवड केलेल्या गावांमधून 14 गावांची निवड स्मार्ट ग्राममध्ये करण्यात आली. तालुकास्तरावर निवडलेल्या गावांना प्रत्येकी दहा लाखांचा निधी मिळणार आहे. 

स्मार्ट ग्रामसाठी तालुका व निवडलेली गावे 
अकोले ः गणोरे, संगमनेर ः पेमगिरी, कोपरगाव ः पोहेगाव, राहाता ः दाढ बुद्रुक, श्रीरामपूर ः महाकाळ वाडगाव, राहुरी ः वांबोरी, नेवासे ः मक्तापूर, शेवगाव ः आव्हाणे बुद्रुक, पाथर्डी ः कासार पिंपळगाव, जामखेड ः शिऊर, कर्जत ः खेड, श्रीगोंदे ः उक्कडगाव, पारनेर ः डिकसळ, नगर ः आठवड. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fourteen villages receive the 'Smart Village' Award