Framing: सोयाबीनच्या आगमनाने तेलबिया सूर्यफुल पिकाचे दर्शन झाले दुर्मिळ

रासायनिक औषध फवारणीने मधमाशाच्या अस्तित्वावर घाला
soyabean
soyabeansakal

Sangali News: सिंचन व्यवस्थेमुळे जिराईत क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटले. त्याचा परीणाम खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या कडधान्यांच्या उत्पन्नावर झाला. तसा खाद्य तेलाच्या उपन्नासाठी घेतल्या जाणाऱ्या सुर्य फुलाच्या पीकावरही झाला आहे. सिंचन क्षेत्र वाढण्यापुर्वी सुर्य फुलाचे उत्पन्न माढ्या पद्धतीने अगर भुईमुग, ज्वारी, बाजरी, तंबाखू पीकात मोगणा पद्धतीने घेतले जायचे. शेती कमी असणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतात आडतासाला हमखास सुर्यफुलाचे ताटवे उठून दिसायचे. हल्ली मात्र हे चित्र पुसटसे झाले असून सध्यस्थितीत वाळवा तालुक्यात सुर्यफुलाचे होणे दुर्मिळ झाले आहे.

soyabean
Specs Frames : मुलींनो, पहा एकापेक्षा एक भारी चष्म्यांचे फ्रेम

हलक्या, मध्यम प्रतीच्या जमीनीत माढ्या पद्धतीने कमी पाणी, कमी खर्च, कमी कालावधीत एकरी सात ते आठ क्विंटलचा उतारा देणारे हे पीक आहे. अतिवृष्टीने सोयाबीन सारखे पीक हातचे जात नाही. पाणी कमी लागत असल्याने अत्यल्प पर्जन्यमानातही पीक तग धरून उत्पन्न घटत नाही. पेरणीनंतर एकदोन कोळपणीवर पीक जोमात येते. सुपाच्या आकाराएवढी येणारी सुर्यफुले शेतकऱ्यास आर्थिक समृध्दी देणारी आहेत. ज्वारी, बाजरीच्या पीकातील सुर्यफुलाचे मोगणे वर्षाकाठी लागणाऱ्या खाद्यतेलाची सोय करणारे असले तरी काळाच्या ओघात सोयाबीनचे क्षेत्र वाढल्याने हे पीक दुर्लक्षिले जावू लागले आहे. पीक आर्थिकदृष्ट्या किफायतशीर असले तरी सोयाबीनचे अवास्तव वाढलेले प्रस्थच सुर्यफुलाच्या पिछाडीस कारणीभूत असल्याचे दिसून येते.

soyabean
Soyabean Chilli Recipe : काहीतरी चटपटीत पण पौष्टीक खायचंय तर सोयाबीन चिली आहे बेस्ट ऑप्शन

सुर्यफुलाचे तेल आरोग्यासाठी लाभदायक:

सूर्यफूलाचे दाणे सेवन केल्याने हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत होते. कोलेस्टेरॉल आणि रक्तदाबावर नियंत्रण मिळविता येते. तेलाचे आहारातून नियमित सेवन झाल्यास शुक्राणूं बळकट होण्यास मदत होते. प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी होतो असे शास्त्रीय निष्कर्ष आहेत.

मधमाशाचे दर्शन दुर्मिळ झाले!

"सेंद्रिय शेणखताच्या जोरावर पीके घेतली जायची तेव्हा सूर्यफूलाच्या ताटव्यावर परागकण वेचण्यासाठी मधमाशांचा गोगांट असायचा. बांधावरील झाडाझुडपावर मधमाशांची पोळी आढळून यायची. काळ बदलत गेला. सुर्यफुलाचे ताटवे दिसेनासे झालेत. रासायनिक विषारी औषधामुळे मधमाशा नाहीशा होत गेल्याने बांधावरील, डोंगर कपारीतील झाडाझुडपावरही मधमाशाचे पोळे आढळून येणे दुर्मिळ झाले आहे.

....विजय दुर्गावळे, माजी सरपंच, लवंडमा

soyabean
Soyabean rate: विदर्भात सोयाबीन मार्केट रेट किती? | Soyabean Rate Today

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com