फसवणूक प्रकरणी सहा जणांवर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

कोल्हापूर - सैन्य आणि रेल्वेत नोकरी लावण्याच्या आमिषाने सात लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद भाऊसाहेब विठ्ठल पाटील (वय 46, रा. कुरुकली, ता. करवीर) यांनी फिर्याद दिली. गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे ः शिवाजी कदम (रा. आवळी, ता. पन्हाळा), सागर ब्रह्मदेव भोसले (31, रा. बारामती), उज्ज्वला रवींद्र वठारकर (रा. राजलक्ष्मीनगर, देवकर पाणंद), अरुण वसंत देशमुख (रा. माळ्याची शिरोली), आलिशा अन्वर कलकत्तावाला (पत्ता माहीत नाही) आणि अजित खंडागळे (रा. सातारा) अशी आहेत. 

भाऊसाहेब पाटील यांचा मोठा मुलगा मानसिंग महाविद्यालयीन शिक्षण घेतो. त्याच्या नोकरीच्या शोधात ते होते. त्यांचा नात्यातील एकाने त्यांना शिवाजी कदम ओळखीचे आहेत. ते सैन्य दलातून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या चांगल्या ओळखी असून ते नोकरी लावू शकतात, असे त्यांना सांगितले. त्यांच्या मोबाइलवर पाटील यांनी संपर्क केला. यानंतर त्यांची भेट सीपीआर रुग्णालयात घेतली. त्यानंतर 22 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2016 या मुदतीत कदम, सागर भोसले, उज्ज्वला वठारकर, अरुण देशमुख, आलिशा कलकत्तावाला या सहा जणांनी नोकरी लावण्याचे आमिष दाखखून सात लाख रुपये घेतले. हा सर्व व्यवहार लक्ष्मीपुरीतील एका कोल्ड्रिंक हाऊसमध्ये झाला होता. मुलाला नोकरीही नाही आणि दिलेले पैसेही परत देत नसल्याने पाटील यांनी याबाबतची फिर्याद दिली. त्यानुसार संबधित सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी सागर भोसले याला काल रात्री अटक केली. उर्वरितांचा पोलिस शोध घेत आहेत. 

Web Title: Fraud case against six people