जास्त रकमेचे आमिष दाखवून डॉक्‍टरची फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

सोलापूर : एचडीएफसी इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून दुप्पटीपेक्षा जास्त रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवून डॉ. हेमंत साठे (वय 58, रा. मुरारजी पेठ, सुभाष चौक, किल्लाबागेसमोर, सोलापूर) यांची तीन लाख 50 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी चौधरी आणि मनीष जोशी या दोघांवर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चौधरी आणि जोशी या दोघांनी फोन करून डॉ. साठे यांना एचडीएफसी कंपनीतून बोलतोय असे सांगितले. तुम्ही आधी काढलेल्या पॉलिसीचे तीन हप्ते राहिले आहेत असे सांगितले. डॉ. साठे यांनी विश्‍वास ठेवून पैसे भरण्याची तयारी दर्शविली. थोडे थोडे करून दीड लाख रुपये भरले. पुढील तीन वर्षाचे हप्ते भरून टाका तुम्हाला दुप्पट पैसे मिळतील असे आमिष डॉ. साठे यांना दाखविण्यात आले. डॉ. साठे यांनी एकूण साडेतीन लाख रुपये बॅंकेच्या खात्यावर भरले. तुम्हाला विम्याचे पैसे हवेत असतील तर आणखी पैसे लागतील असे सांगितल्यावर डॉ. साठे यांना संशय आला. 

चौधरी आणि जोशी या दोघांनी डॉ. साठे यांना उतरवलेल्या पॉलिसीचे कोणतेही कागदपत्र दिले नाही. पॉलिसीचे हप्ते कॅनरा आणि सिंडिकेट बॅंकेत भरण्यास लावले असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक ईश्वर कोकरे तपास करीत आहेत.

Web Title: fraud with doctor by insurance company