मतदार यादी अद्ययावतीकरणाच्या बैठकीत तोतया अधिकारी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

नगर- अवघ्या एक वर्षावर लोकसभा निवडणूक आली आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक शाखेने मतदार यादी अद्ययावतीकरणाचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी नेवासे येथे बोलावण्यात आलेल्या बैठकीत चक्‍क दोन तोतया अधिकारी (बीएलओ) आल्याचे आढळून आले. त्यामुळे आता जिल्ह्यातील तोतया बीएलओ शोध मोहीम सुरू करण्याची शक्‍यता आहे. 

निवडणुकीच्या कामासाठी शिक्षकांना बीएलओ म्हणून नियुक्‍त करण्याच्या सूचना केंद्र व राज्य निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील शिक्षकांना बीएलओ म्हणून नियुक्‍त करण्यात आले आहे. मात्र काही शिक्षकांनी यातून पळवाट शोधत बीएलओचे काम परस्पर काही खासगी लोकांना दिल्याचे आज नेवासे येथील बीएलओच्या बैठकीत समोर आले. ही माहिती मिळताच जिल्हा निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी अरूण आनंदकर यांनी नेवासे तहसीलदारांना अधिक माहिती घेऊन अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

आता तोतया बीएलओ विरोधात जिल्हा निवडणूक शाखा मोहीम सुरू करणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

Web Title: fraud Officer at the meeting of updating voters list