राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून २ टन कांद्याचे मोफत वाटप

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

सोलापूर -  दुष्काळाच्या संकटाने चिंताग्रस्त झालेला शेतकरी आता कांद्याचे दर पडल्याने खचला आहे. भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या विरोधात धोरणे राबविली जात असून, या धोरणाचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने शहराध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली सिद्धार्थ चौकात नागरिकांना तब्बल दोन टन कांदा मोफत वाटण्यात आला.

कांदा मोफत मिळतोय म्हटल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील, तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी तो घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. पिशव्यांमधून आणलेला कांदा रिक्षा ट्रॉलीत ओतून नागरिकांना पिशव्या भरून वाटप करण्यात आला. भाजप सरकारचा धिक्कार असो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणणारे भाजप सरकार मुर्दाबाद, फडणवीस सरकारचा निषेध असो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई मिळालीच पाहिजे आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला.

Web Title: Free distribution of 2 tons onion from NCP in solapur