उपवासाच्या पदार्थांचे मोफत वाटप

राजकुमार शहा 
सोमवार, 23 जुलै 2018

मोहोळ (सोलापूर) : पेनूर (ता. मोहोळ) येथील चरणराज चवरे मित्र परिवार हिंदविर प्रतिष्ठान यांच्या वतीने आषाढी वारीसाठी निघालेल्या वैष्णवांना मोफत उपवासाच्या पदार्थांचे वाटप शिवसेना नेते चरणराज चवरे यांच्या हस्ते करण्यात आले या सामाजिक उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे.

आज आषाढी एकादशी असल्याने परिसरातील अनेक वैष्णव पंढरपूरला पायी जातात त्यात महिलांचाही मोठा समावेश असतो खांद्यावर भगवी पताका व मुखात हरिनामाचा गजर करीत वैष्णव पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करीत असतात. त्यांच्या सेवेची संधी मिळावी यासाठी चवरे यांनी सकाळी सहा वाजल्यापासुन चाळीस किलो शाबुदाणा खिचडी शंभर डझन केळी पन्नास थंड पाण्याच्या जार मधील पाण्याचे  व चहाचे वाटप केले. 

पंढरपूर कडे निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधील प्रवाशी चालक वाहक यांनाही फराळाचे वाटप केले मोठ्या संखेने वैष्णवांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. यावेळी देविदास चवरे, राजु चवरे, लखन काशीद, मुन्ना शेख, विठ्ठल माने, धनाजी पुजारी, विलास माने, सागर चवरे, विठ्ठल कोरे, अरुण चव्हाण, गजानन बाचल, सुधीर चवरे, गणराज पवार, माऊली क्षीरसागर, रामदास चवरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.

Web Title: free distribution of food of fast