नोंदणीकृत विद्यार्थ्यांनाच देणार मोफत पास 

तात्या लांडगे
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

सोलापूर - राज्यातील 151 तालुक्‍यांसह 267 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर झाला. त्या पार्श्‍वभूमीवर दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना मोफत एसटी बसचे पास देण्याची घोषणा सरकारने केली. परंतु, त्याला बगल देत राज्य परिवहन विभागाने वेगळीच शक्‍कल लढविली आहे. मागील सत्रात पासची नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनाच बस पास दिले जात असल्याचे दिसून येते. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्य कुटुंबांना व शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता राज्य सरकारने विविध उपायोजना व सवलती जाहीर केल्या. मात्र, त्यानुसार अद्यापही अंमलबजावणी सुरू झाल्याचे दिसून येत नाही. विद्यार्थ्यांना मोफत एसटी पासप्रमाणेच दुष्काळी तालुक्‍यातील शेतकऱ्यांना वीजबिलात 33.5 टक्‍के सवलत जाहीर केली; परंतु महावितरणकडूनही सवलत देण्यास सुरवात झालेली नाही. 

माझे वडील दुधाचा छोटा व्यवसाय करतात. एसटीचा प्रवास परवडत नसल्याने त्यांच्यासमवेतच शाळेत जाते. दुष्काळी तालुक्‍यातील विद्यार्थ्यांच्या मोफत पाससाठी मी संबंधित आगारात पास मागितला. परंतु, यापूर्वी पास घेतला नसल्याने मोफत पास मिळणार नाही, असे सांगण्यात आले. 
- मयूरी भागानगरे, विद्यार्थिनी, पंढरपूर 

मागील सत्रात ज्या ज्या विद्यार्थ्यांची पास घेतल्याची नोंद आहे, अशा विद्यार्थ्यांनाच दुष्काळामुळे मोफत बस पास देण्यात येत आहेत. त्याशिवाय अन्य विद्यार्थ्यांना मोफत पास दिले जाणार नाहीत. 
- अभिजित भोसले, सहायक जनसंपर्क अधिकारी, राज्य परिवहन 

Web Title: Free pass to registered students