फुलंब्रीमध्ये नागरिकांना मोफत पाणीवाटप
फुलंब्री - सध्या सर्वत्र पाणी टंचाईचे संकट पसरले असतांना नगरपंचायतीच्या वार्ड क्रमांक 8 मधील नागरिकांना मोफत पाणी भरण्याची सुविधा सुहास भाऊ शिरसाठ मित्र परिवारातर्फे करून देण्यात आली. या मोफत पाणी वाटपाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक प्रभाकर सोनवणे, बाळाभाऊ मनोरकर, कचरूशेठ दुतोंडे, प्रल्हाद सोनवणे, धनंजय सीमंत यांच्या हस्ते गुरुवारी (ता.31) रोजी सायंकाळी सहा वाजता करण्यात आला. या कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी योगेश पाटील, भाजयु मोर्चाचे शहराध्यक्ष योगेश मिसाळ, वाल्मिक जाधव, नगरसेवक एकनाथ ढोके यांची प्रमुख उपस्थिती होती.

गेल्या अनेक वर्षापासून पावसाचे प्रमाण सातत्याने कमी होत असल्याने जमिनीच्या भूगर्भातील पाणी पातळीत दिवसेंदिवस घट होत चालली आहे. अनेक नागरिकांनी घराच्या परिसरात बोअर घेतले मात्र जमिनीत पाण्याचे प्रमाणच कमी असल्याने जलसंकटाचा सामना नागरिकांना करावा लागत होता. वार्ड क्रमांक आठ हा विद्यमान नगरसेविका तथा उपनगराध्यक्षा इंदुबाई मिसाळ यांचा आहे. पाणी टंचाईची समस्या सुहास भाऊ शिरसाठ मित्र परिवाराच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वखर्चाने या वार्डात पाण्याची मोठी टाकी ठेऊन पाणी भरण्यासाठी चार तोट्या काढण्यात आल्या. त्यामुळे या वार्डातील नागरिकांना पाणी भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
याप्रसंगी मजर सय्यद, आवेज चिस्ती, सोमीनाथ दुतोंडे, अमोल मनोरकर, मोहन मनोरकर, कांता आढाव, रत्नाकर आढाव, गोकुळ घरमोडे, राजेंद्र मिसाळ, दिनेश काथार, अक्षय आढाव, रमेश मिसाळ, भास्कर वानखेडे, सागर माठे, एकनाथ दुतोंडे, सुदेश मिसाळ, शेख हारून, मनीष राऊत, संतोष मिसाळ, नंदू आढाव, दीपक शिरसाठ, नवाब पटेल, गजानन तावडे, सतीश मिसाळ, मनोज वाघ, संतोष सुरभैय्ये, वैभव दुतोंडे, नागेश भारद्वाज यांच्यासह आदी ग्रामस्थांची मोठ्या संखेने उपस्थिती होती.