अंजनगाव खेलोबो येथे यात्रेच्या काळात मोफत पाण्याचा टँकर

pani
pani

उपळाई बुद्रूक (सोलापुर) : दुष्काळाने होरपळत असलेल्या अंजनगाव खेलोबो (ता.माढा) येथील पिण्याच्या पाण्याची समस्या 'सकाळ' ने 'काय बी करा पण पाण्याची व्यवस्था करा' या मथळ्याखाली शुक्रवारी (ता.१७) संपुर्ण राज्यात प्रसिद्ध केली होती.त्याचबरोबर ईसकाळ फेसबुकच्या माध्यामातून तेथील व्हिडिओ चित्रीकरणही प्रसिद्ध केले होते. याची दखल घेउन यात्रेकरीत टँकरच्या मदतीसाठी टेंभुर्णी येथील युवकांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

अंजनगाव खेलोबो येथील अबालवृध्द महिला व लहान मुलांची समस्या लक्षात घेऊन. गावच्या यात्रेत पाण्यासाठी नागरिकांची उडणारी धावपळ थांबावी. या हेतुने 'सकाळ' च्या बातमीने प्रेरित होऊन टेंभुर्णी येथील सध्या पुणे येथे शिक्षण घेत असलेले दिलीपराव भोसले युवा प्रतिष्टानचे सर्वासर्वे अविनाश भोसले व त्यांच्या मित्रांनी या गावासाठी दुष्काळात 'फुल नाय फुलांची पाकळी' म्हणून यात्रेच्या कालावधीत मोफत टँकर सुरू करून मदतीचा हात पुढे केला आहे. शनिवारी दुपारी सरपंच अप्पासाहेब वाघमोडे, उपसरपंच भागवत चौगुले व अविनाश भोसले यांच्या हस्ते मोफत पिण्याच्या पाण्याच्या  टँकरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी दिग्विजय पाटील, महेश गवळी, नाना वाघमोडे, सनातन नाईकनवरे, धनाजी चवरे आदि उपस्थित होते. अंजनगाव खेलोबो येथे मोफत टँकर सुरू करण्याठी अविनाश भोसले यांना महाविर जाधव, प्रज्वल पाटील, रोहित थोरात, सौरभ सांळुखे यांचे आर्थिक सहकार्य लाभले. 

'''सकाळ' मधील बातमी पाहुन मन हेलावून गेले. यात्रेच्या काळात तरी गावाला पाणीटंचाई भासू नये. या हेतुने शंभुशासन प्रतिष्टान व दिलीपराव भोसले प्रतिष्टानच्या मदतीचा हात पुढे केला आहे.''
- अविनाश भोसले  सामजिक कार्यकर्ते टेंभुर्णी 

''आमच्या गावातील पाण्याच्या समस्येला 'सकाळ' ने वाचा फोडली. व सर्वांच्या समोर येथील हलाखीची परिस्थिती निदर्शनास आणुन दिली. त्यामुळे अविनाश भोसले यांनी यात्रेकाळात टँकरसाठी केलेली मदत लाख मोलाची आहे. 'सकाळ' चे सर्व ग्रामस्थांच्या शतशः आभारी आहोत.''
- अप्पासाहेब वाघमोडे , सरपंच अंजनगाव खेलोबो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com