आडी येथील सीमासत्याग्रही वसंत देखणे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आडी येथील सीमासत्याग्रही वसंत देखणे यांचे निधन

आडी येथील सीमासत्याग्रही वसंत देखणे यांचे निधन

sakal_logo
By
अमोल नागराळे : सकाळ वृत्तसेवा

निपाणी : आडी (ता. निपाणी) येथील जुन्या काळातील शिक्षक व सीमा सत्याग्रही वसंत धोंडीबा देखणे (वय ९३) यांचे बुधवारी (ता. १०) निधन झाले. देखणे यांनी स्वातंत्र्यलढ्यासह सीमालढ्यात सहभाग घेतला होता.

हेही वाचा: छापे मारणारे आले तर त्यांचे स्वागतच करु - नवाब मलिक

देखणे यांनी १९४५ च्या सुमारास स्वातंत्र्यलढा तर त्यानंतर सीमालढ्यातील सहभागाबद्दल कारावास भोगला होता. पहिल्यांदा ११ दिवस व त्यानंतर ४० दिवस असे एकूण ५१ दिवस कारावास त्यांनी बळ्ळारी व हिंडलगा कारागृहात भोगला होता. देखणे हे निवृत्त प्राथमिक शिक्षक होते.

हेही वाचा: पुण्यात ईडीचे 7 छापे; नवाब मलिकांच्या खात्यासंबंधी चौकशीला वेग?

मुंबई प्रांत असताना आडीसह सोनगे, हुपरी येथील प्राथमिक शाळेत सेवा बजावली होती. आडी येथील मराठी शाळेचा शतकमहोत्सवी कार्यक्रम देखणे यांच्या पुढाकाराने झाला होता. त्यांच्या मागे दोन मुली आहेत. उद्या शुक्रवारी (ता. १२) रक्षाविसर्जन आहे.

loading image
go to top