शुक्रवारचा दिवस-रात्र फिफ्टी फिफ्टी

WhatsApp Image 2020-03-19 at 2.23.48 PM.jpeg
WhatsApp Image 2020-03-19 at 2.23.48 PM.jpeg

आज 20 मार्च. विषुव दिन. सहा महिने दक्षिण गोलार्धात उतरलेला सूर्य आज वैषुविक वृत्तावर तळपताना दिसणार. त्याच्या प्रकाशात आज संपूर्ण पृथ्वी न्हाऊन निघणार. आजचा दिवस व रात्र सर्वत्र समसमान कालावधीचे (12 तासांचे) असणार. वसंत ऋतूचा प्रारंभ होऊन, शिशिराच्या पानगळीत निष्पर्ण झालेल्या वृक्ष वेलींना नवीन पालवी फुटणार. सर्व सृष्टी नवचैतन्याने बहरणार.

आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्या प्रतलाशी ती लंबरूप नसून तिचा अक्ष 23.5 अंशांनी कललेला आहे. त्यामुळे वैषुविक वृत्त ( विषुव वृत्ताने आकाशात तयार होणारे काल्पनिक वृत्त) आणि आयनिक
वृत्त (सूर्याचा आकाशातील भासमान मार्ग) यांच्यामध्ये 23.5 अंशाचा कोन तयार झाला आहे. ही वृत्ते एकमेकांस दोन बिंदूत छेदतात. त्या बिंदुंना Equinox संपात बिंदु म्हणतात.


आयनिक वृत्तावरुन सरकणारा सूर्य जेव्हा आकाशातील वैषुविक वृत्तावर येतो तेव्हा
पृथ्वीवासीयांसाठी तो बरोबर विषुव वृत्तावर असतो. त्यामुळे त्याचे किरण संपूर्ण पृथ्वीवर पोहोचतात आणि सर्वत्र दिवस व रात्र समान कालावधीचे घडतात.
20 /21 मार्च रोजी सूर्य ज्या संपात बिंदुवर असतो त्यास vernal equinox वसंत संपात बिंदु म्हणतात. या दिवसापासून सूर्य उत्तर गोलार्धात प्रवेश करतो आणि तिकडे दिवस हळूहळू मोठा व रात्र लहान होऊ लागते. बरोबर सहा महिन्यांनी सूर्य दुसऱ्या संपात बिंदुवर असतो (22/23 सप्टेंबरला), त्यापुढे त्याचा दक्षिण गोलार्धात प्रवेश होतो. आणि उत्तर गोलार्धात शरद ऋतुस प्रारंभ होतो म्हणून त्या बिंदुंला " शरद संपात बिंदु' असे म्हणतात.

आपण गुढी पाडव्यापासून नवीन वर्षाची सुरुवात किंवा चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूला सुरुवात झाली असे मानतो. खगोल आणि भूगोलाचा विचार करता पृथ्वीचा कललेला अक्ष आणि तिचे सूर्याभोवतीचे परिभ्रमण यांचा परिणाम म्हणून पृथ्वीवर ऋतु घडतात. आजपासून सूर्य उत्तर गोलार्धात प्रवेश करेल आणि वसंत ऋतूचा प्रारंभ होईल म्हणून आजचा दिवस "वसंत संपात दिन' म्हणूनही ओळखला जातो.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com