Video : महापरिक्षा पोर्टल पूर्णत: बंद करावे ; कोल्हापूरात मोर्चा...

Front in kolhapur because of Close the mahaprikshaportal completely
Front in kolhapur because of Close the mahaprikshaportal completely
Updated on

कोल्हापूर - महापरिक्षा पोर्टल पूर्णत: बंद करावे, रिक्त पदांच्या भरती प्रक्रिया ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राबविली जावी, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा स्पर्धा परीक्षा विद्यार्थी कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. समितीच्यावतीने जोरदार घोषणा देत दसरा चौक, व्हिनस कॉर्नर ते बसत-बहार टॉकिज रस्तावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन दिेले.

 निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाच्या काही रिक्त पदांसाठीची भरती प्रक्रिया ही महापरीक्षा या ऑनलाईन पोर्टल तर्फे घेण्यात येते. पोर्टलच्या एकूणच सर्व कारभारात अक्षम्य असे गंभीर गैरप्रकार आढळून आले आहेत. एमपीएससी विद्यार्थी समन्वय समितीतर्फे व महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांतर्फे हे पोर्टल बंद करण्यासाठी अनेक आंदोलने केली आहेत. सरकारकडून यावर कोणताही ठासे तोडगा निघाला नाही. नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर या पोर्टलला स्थगिती देण्यात आली. यातील त्रुटी दूर करून हे पोर्टल पुन्हा चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरीही, पोर्टल वर अद्यापही दुरूस्ती न करण्याऐवढ्या चुकीच्या आहेत. त्यामुळे हे पोर्टत तात्काळ रद्द केले पाहिजे, अशीही मागणी करण्यात आली. यावेळी, तेजश्री गायकवाड,  विशाल पाटील, अनिता चव्हाण सचिन लोंढे, संघर्ष कांबळे, मंगेश हजारे, कौस्तुभ पाटील, शंतनू घोटणे, जावेद तांबोळी, संघर्ष कांबळे, विजू लोखंडे, संदिप कांबळे, निता चव्हाण उपस्थित होते. 

प्रमुख मागण्या -

  • महापरीक्षा पोर्टल पूर्णत: बंद करावे. 
  • रिक्त पदांच्या भरती प्रक्रिया हि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राबविण्यात यावी 
  • रिक्त पदांची भरत तात्काळ सुरू करावी 
  • गट "ब' व "क' संयुक्त पूर्व परिक्षा पध्दती रद्द करून पूर्वीप्रमाणे विभक्त पूर्व परीक्षा पध्दती अमलात यावी 
  • पोलीस शिपाई पदासाठी पूर्वीप्रमाणे शारीरिक चाचणी प्रथम व नंतर लेखी परीक्षा घ्यावी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com