‘एफआरपी’ हवी; साखरेचा दर वाढवा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

कोल्हापूर - साखरेच्या दरावर ‘एफआरपी’चा दर निश्‍चित केला. आता साखरेचे दर कोसळल्यामुळे ‘एफआरपी’ देणे अवघड आहे. कारखान्यांनी प्रतिक्विंटल ३२०० ते ३३०० रुपयांच्या खाली साखर विक्री केल्यास तोटा होत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीत पंतप्रधानांसमवेत बैठक घेतली जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी आज येथे दिली.

शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. १३ ते १५ मेच्या दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत दिल्लीत बैठक होण्याची शक्‍यता आहे.

श्री. नाईकनवरे म्हणाले, ‘‘प्रत्येक वर्षीचा गळीत हंगाम सुरू होत असताना बाजारातील साखरेच्या दरानुसारच ‘एफआरपी’ची रक्कम ठरवली जाते. यावर्षीही असा दर ठरविला. गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच किरकोळ बाजारात साखरेचे दर ढासळू लागले. याचा फटका साखर कारखान्यांना आणि शेतकऱ्यांना बसला आहे. सरकारने अनुदान जाहीर केले आहे. मात्र, या अनुदानाने साखर उद्योगाला उभारी मिळणार नाही. यासाठी प्रतिक्विंटल ३२०० ते ३३०० रुपये सरासरी दर असणे योग्य आहे.  

राज्य साखर संघाचे संजय खताळ, कुंभी कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, पी. जी. मेढे, तसेच जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक, संचालक उपस्थित होते.

कारखान्यांची कोंडी
‘एफआरपी’ देणे बंधनकारक असताना दुसरीकडे साखरेला दर मिळत नाही अशी स्थिती आहे. साखर विक्रीतून मिळणारे उत्पन्न आणि शेतकऱ्यांना द्यावी लागणारी ‘एफआरपी’ याचा ताळमेळच बसत नाही. त्यामुळे कारखान्यांची कोंडी झाली आहे.

Web Title: frp sugar rate prakash naiknavare