गडहिंग्लज येथील शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांना मारहाण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

कोल्हापूर - गडहिंग्लज येथील शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांना अज्ञातांनी भररस्त्यात बेदम मारहाण केली. जनता बाजार चौकात फिल्मी स्टाईलने झालेल्या मारहाणीत राजेंद्र जनार्दन पेडणेकर (वय 55) जखमी झाले. त्याच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

गडहिंग्लज येथील ओंकार शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त पेडणेकर आज बागल चौक येथील धर्मादाय आयुक्त कार्यलयात कामानिमित्त आले होते. काम आटोपून ते जाताना जनता बाजार चौक येथे अज्ञातांनी त्याच्यावर हल्ला चढवत बेदम मारहाण केली. नागरिकांनी पेडणेकर यांची सुटका केली. मारहाणीचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. जखमी अवस्थेत ते शाहूपुरी पोलिस ठाण्यात गेले. तेथून त्यांना सीपीआर येथे उपचारासाठी पाठवले. या प्रकरणी पेडणेकर यांच्या फिर्यादीनुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

Web Title: Gadhingjaj Education Society trusty bitten by unknown person