कचरामुक्त शहरात गडहिंग्लजचा समावेश

कचरामुक्त शहरात गडहिंग्लजचा समावेश

गडहिंग्लज - केंद्र शासनातर्फे राबवण्यात आलेल्या स्वच्छ सर्व्हेक्षण 2019 अभियानातील कचरामुक्त शहरामध्ये गडहिंग्लज शहराचा समावेश झाला आहे. राज्यातील 40 शहरांमध्ये गडहिंग्लजने पटकावलेले स्थान गौरवास्पद असल्याचे मत नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी व्यक्त केले. 6 मार्च रोजी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते या शहरांचा गौरव होणार आहे. पालिकेने घनकचरा व्यवस्थापनासाठी राबवलेल्या विविध उपाययोजनांचे हे यश म्हणावे लागेल. 

गडहिंग्लजने स्वच्छ सर्व्हेक्षण 2018 अभियानातही चांगले यश मिळविले आहे. पाठोपाठचे हे यश पालिका पदाधिकारी प्रशासन, आरोग्य विभाग, सफाई कामगार व नागरिकांना प्रेरणादायी ठरली आहे. शहरात रोज 7 ते 8 टन कचरा गोळा होतो. कित्येक वर्षापासून पालिकेने ओला व सुका अशा वगीकृत कचऱ्याचे संकलन करीत आहे. सुमारे आठहून अधिक घंटागाड्याद्वारे वगीकृत कचरा गोळा केला जातो. ओल्या कचऱ्यापासून गांडूळ निर्मिती प्रकल्प राबवला आहे. सुक्‍या कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी संकेश्‍वर रोडवरील कंपोष्ट डेपोमध्ये अत्याधुनिक मशिनही कार्यरत आहे. या मशिनद्वारे माती, दगड, विठा, प्लास्टिक असे घटक वेगळे होतात. यातून मिळणाऱ्या खतसदृश्‍य मातीला मोठी मागणी आहे. यामुळे पालिकेने या खताची तपासणी करून ब्रॅण्डही तयार केला आहे. विविध प्रदर्शनामध्ये या खत विक्रीचा स्टॉल दाखल होत आहे. याशिवाय हागणदारीमुक्त शहराचाही दर्जा पालिकेला मिळाला आहे. 90 टक्‍क्‍यांवर वैयक्तिक शौचालये आणि इतर कुटूंबांना सार्वजनिक शौचालयांना जोडले आहे. 

याशिवाय पालिकेने स्वच्छतेची जागृती व्हावी यासाठी शहरातील प्रमुख ठिकाणी भिंतीवर स्वच्छताविषयक बोलकी चित्रे रेखाटली आहेत. त्याचा प्रभाव नागरिकांवर होत असून शहर स्वच्छतेत सकारात्मक बदल दिसत आहेत. विविध स्पर्धा, व्याख्याने, मेळावे आदी माध्यमातून स्वच्छतेचा जागर शहरात मांडला होता. शहरातील गल्लीबोळातील वृक्षसंपदा हे गडहिंग्लजचे खास वैशिष्ट्य ठरले आहे. शहर स्वच्छ, सुंदर व हिरवेगार होण्यामागचे या सर्व उपाययोजना उपयुक्त ठरल्या. या सर्व कामाची दखल घेवून शासनाने स्वच्छ सर्व्हेक्षण-2019 मध्ये गडहिंग्लजचा समावेश कचरामुक्त शहरामध्ये करून गौरविणार आहे. 

शहरवासियांसह पालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि सफाई कामगारांचे खरे श्रेय या यशामागे आहे. पालिका पदाधिकाऱ्यांसह प्रशासनाने विविध माध्यमातून शहरात स्वच्छतेचा जागर मांडला. नागरिकांनी त्याला सहकार्य केले. यामुळे बक्षीस रूपाने त्याचे फलीत शहराला मिळत आहे. स्वच्छ, सुंदर गडहिंग्लजसाठी यापुढेही शहरवासियांनी पालिकेच्या पाठीशी रहावे.
- स्वाती कोरी,
नगराध्यक्षा

सलग दुसऱ्या वर्षी यश
पालिकेने घनकचरा व्यवस्थापनात केलेल्या कामाची दखल घेवून स्वच्छ सर्व्हेक्षण-2018 अभियानात गडहिंग्लज पालिकेने सहा राज्यातील शहरांच्या यादीत स्थान पटकावले. त्यासाठी पाच कोटीचे बक्षीसही जाहीर झाले आहे. आता सलग दुसऱ्या वर्षीही 'स्वच्छ सर्व्हेक्षण 2019' अभियानात गडहिंग्लजचा समावेश कचरामुक्त शहरात झाला आहे. पाठोपाठच्या यशामुळे गडहिंग्लजचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहचले आहे.

कचरामुक्त शहरे
कचरामुक्त शहरात कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजसह पन्हाळा, वडगाव नगरपालिका तर कोल्हापूर महापालिकेचाही समावेश आहे. राज्यातील नवी मुंबई, चंद्रपूर, लातूर, मुंबई, उमरेड, आंबेजोगाई, खोपोली, देवराई प्रवरा, इंदापूर, अहमदनगर, पोंभुर्णी, मलकापूर ही शहरे स्वच्छ सर्व्हेक्षण 2019 मध्ये तर मूळ, विजयपूर, वसईविरार, मीरा भाईंदर, नवी मुंबई, खोपोली, जुन्नर, लोणावळा, भोर, इंदापूर, संगमनेर, परळी, पंढरपूर, मंगळवेढा, महाबळेश्‍वर, पाचगणी, कराड, रत्नागिरी, विटा, तासगाव, कोरेगाव या शहरांचा समावेश कचरामुक्त शहर यादीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com