राज्यातील 112 साखर कारखान्यांना गाळपासाठी परवानगी : गायकवाड 

GALPAS 112 Sugar factories allowed : Gaikwad
GALPAS 112 Sugar factories allowed : Gaikwad

संगमनेर : ""राज्यातील 162 पैकी 112 साखर कारखान्यांना गाळप परवाना दिला आहे. ऊसउत्पादकांना पहिल्या टप्प्यात उसाचे पेमेंट मिळण्यासाठी सहकार विभाग आग्रही आहे. प्रतिकूलतेतून आर्थिक समृद्धी निर्माण करून शेतकरी व तालुक्‍याचा विकास साधणारा थोरात सहकारी साखर कारखाना हा इतरांसाठी मार्गदर्शक ठरला आहे,'' असे गौरवोद्‌गार सहकार आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढले. 

भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याला नुकतीच गायकवाड यांनी भेट दिली. अतिथी विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष ऍड. माधवराव कानवडे होते. 

थोरात कारखान्याची वाटचाल आदर्शवत 
गायकवाड म्हणाले, ""शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्नाचे साधन असतानाही राज्यातील अनेक साखर कारखाने व त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. काटकसर व पारदर्शकतेतून त्यावर मार्ग काढणे शक्‍य आहे. 800 मेट्रिक टनापासून सुरवात केलेला थोरात सहकारी कारखाना आता 5500 मेट्रिक टन उत्पादन क्षमता व 30 मेगावॉट वीजनिर्मिती करतो. ही वाटचाल सर्वांसाठी आदर्शवत आहे. 

सहकार जपायला हवा 
सर्वांच्या विकासाचे साधन असलेला सहकार जपायला हवा. मागील वर्षी राज्यात 107 लाख मेट्रिक टनाचे साखरउत्पादन झाले असून, 23 हजार 400 कोटी रुपयांच्या एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली आहे. आगामी काळात ब्राझीलच्या धर्तीवर साखर व इथेनॉलनिर्मितीची सांगड घालून उत्पादन करावे लागणार आहे.'' 

ठिबकवरील ऊस लागवडीसाठी अनुदान द्यावे 
कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर म्हणाले, ""संगमनेर तालुका हा पर्जन्यछायेचा प्रदेश असल्याने दिवंगत भाऊसाहेब थोरात यांनी मोठ्या प्रयत्नांनी साखर कारखान्याची परवानगी मिळविली. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची उत्तरोत्तर प्रगती सुरू आहे. सहकार विभाग व राज्य सरकारने पाण्याचा अतिवापर टाळणाऱ्या ठिबक संचावरील लागवडीसाठी अनुदान देण्यात यावे.'' उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे, साखर संचालक डी. बी. मुकणे, प्रादेशिक सहसंचालक बाजीराव शिंदे, विशेष लेखापरीक्षक राजेंद्र देशमुख, इंद्रजित थोरात, बाबा ओहोळ आदी उपस्थित होते. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com