जुगार अड्ड्यावर छापा ; 19 जणांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

नगर : नगर-मनमाड रस्त्यावरील सावेडी नाक्‍याजवळ सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर (बिंगो) काल (सोमवार) रात्री पोलिसांनी छापा घालून 19 जणांना अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख 16 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

जालिंदर शिंदे, अमोल दंडवते, नितीन घोडके, योगेश पंगूडवाले, लक्ष्मण कुऱ्हाडे, योगेश घोडके, साहेबराव सोनवणे, प्रकाश सोनवणे, सीताबा जंगम, उद्धव गागरे, विकास गोडवल, नितीन खांबकर, जयप्रसाद सोनसाळे, कृष्णा शिंदे, अक्षय शिंदे, सुरेश पंचवाणी, धनंजय इटकर, नरेंद्र असलकर, प्रशांत पाटकुले (सर्व रा. नगर) अशी जुगाऱ्यांची नावे आहेत.

सावेडी नाका परिसरात बिंगो जुगारअड्डा सुरू असल्याची माहिती उपअधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली. त्यानुसार काल रात्री सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील, पोलिस नाईक गणेश चव्हाण, सचिन जाधव यांच्या पथकाने सावेडी नाक्‍यावरील राजदीप जनरल स्टोअरखालील अपार्टमेंट बेसमेंटमधील गाळ्यात छापा घातला. वरील सर्वांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून जुगाराच्या साहित्यासह दोन लाख 16 हजार 750 मुद्देमाल जप्त केला. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Gambling raid ; 19 people arrested