गांधीनगरला नियोजनाची गरज

सुनील पाटील
बुधवार, 4 जुलै 2018

कोल्हापूर - घराला घर आणि दुकानाला लागून दुकान. रोज फुललेली कपड्यांची बाजारपेठ. सर्वच्या सर्व १५० घरांचे प्रॉपर्टी कार्ड. एकाच्याही नावाचा सात-बारा नसणारे गांधीनगर (ता. करवीर) कोल्हापूर शहराशेजारी मोठ्या प्रमाणात उलाढाल असणाऱ्या कपड्यांच्या बाजारपेठेचे ठिकाण आहे. 

कोल्हापूर - घराला घर आणि दुकानाला लागून दुकान. रोज फुललेली कपड्यांची बाजारपेठ. सर्वच्या सर्व १५० घरांचे प्रॉपर्टी कार्ड. एकाच्याही नावाचा सात-बारा नसणारे गांधीनगर (ता. करवीर) कोल्हापूर शहराशेजारी मोठ्या प्रमाणात उलाढाल असणाऱ्या कपड्यांच्या बाजारपेठेचे ठिकाण आहे. 

गांधीनगरचे महत्त्व वाढत असल्याने शेजारीच असणाऱ्या वळीवडे, चिंचवाडसह इतर गावांमध्येही मोठी वस्ती वाढत आहे. अवैध बांधकामे आणि अतिक्रमणाने गांधीनगरला वेढले आहे. एकीकडे दाटीवाटीने वसलेले गांधीनगर आणि दुसरीकडे होणारे अतिक्रमण थांबविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीला पेलावी लागत आहे. त्यामुळे आधीच दाटीवाटीने वसलेल्या गांधीनगरमध्ये कोणती योजना आणि नियोजन होणार हे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले पाहिजे. 

प्राधिकरणामध्ये गावचा विकास साधला जाणार आहे. लोकांचे कल्याण होणार आहे. गांधीनगरसारख्या उपनगराचा कायापालट करण्याची क्षमता प्राधिकरणात असल्याचे सांगितले जात आहे; मात्र गावच दाटीवाटीने वसलेले आहे. त्यामध्ये प्राधिकरण नव्याने काय करणार हा प्रश्‍न आहे. एकीकडे ग्रामपंचायतींना आव्हान स्वीकारावे लागत आहे, तर दुसरीकडे प्राधिकरणाकडून कोणत्या सुविधा मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.

कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणारे गांधीनगर शहरातील महत्त्वाची कापड बाजारपेठ आहे. यातूनच मिळालेल्या करातून लोकांना सुविधा दिल्या जात आहेत; मात्र येथील दुकान असो किंवा घर, हे सरासरी १० बाय ४० स्क्‍वेअर फुटांमध्ये उभे आहे. सातबारा नसलेले गाव आहे असे म्हटले तरी चालू शकते. कारण या गावामध्ये १५० प्रॉपर्टी कार्ड आहेत. यावरच त्यांच्या ग्रामपंचायतीचा कारभार सुरू आहे. 

उपसरपंच सोनी सेवलानी 
म्हणाल्या, ‘‘प्राधिकरणामुळे लोकांवर जादा कराचा बोजा पडणार असल्याने याचा विचार करावा लागेल. त्यामुळे ग्रामपंचायतच असावी, असा आग्रहही ग्रामस्थांचा आहे.’’

गांधीनगरमध्ये सर्वच समाजाचे लोक आहेत. त्यांना न्याय देण्याच्या हेतूने ग्रामपंचायत काम करत आहे. प्राधिकरणाची अंमलबजावणी कशी होणार, याकडे लक्ष लागले आहे. ग्रामपंचायतींचा विकास करावा, यासाठी याचे नियोजन आहे; पण सध्या ग्रामपंचायतींना चांगला निधी आहे. याउलट प्राधिकरणाने आपली कोणती भूमिका स्पष्ट केलेली नाही. 
- रितू ललवानी, सरपंच, गांधीनगर. 

दृष्टिक्षेपात गांधीनगर
 लोकसंख्या - २५ हजार 
 मतदार - १० हजार

Web Title: gandhinagar cloth market encroachment municipal development