आसरे येथील जवान गणेश ढवळे हुतात्मा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

वाई - आसरे (ता. वाई) येथील आंबेदरावाडीतील जवान गणेश कृष्णा ढवळे (वय 29) हे जम्मू काश्‍मीरमध्ये झालेल्या हिमस्खलनात हुतात्मा झाले. ही बातमी समजताच परिसरात शोककळा पसरली. हवामान अनुकूल असेल, तर गणेश यांचे पार्थिव उद्या (मंगळवार) सायंकाळपर्यंत येथे येईल, असे लष्करी सूत्रांनी सांगितले. 

सामान्य शेतकरी कुटुंबातील गणेश 2012 मध्ये लष्करात भरती झाले होते. त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला असून, समर्थ हा पाच महिन्यांचा त्यांना मुलगा आहे. त्यांचे वडील कृष्णा भाऊ ढवळे व आई राधा कृष्णा ढवळे हे शेती करतात. 

शनिवारी (ता. 28) माचिल सेक्‍टरमध्ये हिमाच्छादित रस्त्यावरून जात असताना तो रस्ता अचानक खचल्याने पाच जवान खड्ड्यात पडले होते. यानंतर लष्कराच्या बचाव पथकाने खराब वातावरण असतानाही प्रयत्नांची शर्थ करत त्या सर्वांना बाहेर काढले होते. बर्फात अडकून पडल्यामुळे या सर्वांचे शरीर गोठले होते. त्यांच्यावर उपचारासाठी आज त्यांना श्रीनगर येथील रुग्णालयात हलविले जात असतानाच त्या सर्वांचा मृत्यू झाला, असे लष्करातील सूत्रांनी सांगितले. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्‍यातील रामापूरवाडी येथील जवान रामचंद्र शामराव माने हेही या दुर्घटनेत हुतात्मा झाले आहेत.

Web Title: Ganesh Davle Martyr