esakal | गणेशोत्सवामुळे कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर वाहनांच्या रांगा
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवामुळे कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर वाहनांच्या रांगा

दूधगंगा नदीपासून कागलमध्ये असणाऱ्या आरटीओ कार्यालयापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

गणेशोत्सवामुळे कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर वाहनांच्या रांगा

sakal_logo
By
अनिल पाटील

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गावर दुधगंगा नदीजवळ असलेल्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. शुक्रवारी (10) गणेश आगमन होणार असल्याने महाराष्ट्रातून कर्नाटकात व कर्नाटक लगत असणाऱ्या महाराष्ट्रातील चंदगड, आजरा, गडहिंग्लज, उत्तूर या ठिकाणी गणेश चतुर्थीला घरी जाण्यासाठी नागरिक निघाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

हेही वाचा: पारंपारिक महाराष्ट्रीय परफेक्ट लुकसाठी 'या' टिप्स फॉलो करा

दूधगंगा नदीपासून कागलमध्ये असणाऱ्या आरटीओ कार्यालयापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या ठिकाणी सीमा तपासणी नाका ओलांडून जाण्यासाठी किमान एक तासाचा वेळ लागत आहे. गुरुवारी (9), शुक्रवारी (10) दोन दिवस या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. तसेच महाराष्ट्रातून सीमावर्ती कर्नाटक व महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्ती आणण्यासाठी युवक मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ यांचीही गर्दी झाली.

हेही वाचा: 'महाराष्ट्रातील मल्लांनी धरली उत्तर भारताची वाट'

गणेश चतुर्थीच्या सणाला जाण्यासाठी उत्तूर, आजरा, गडहिंग्लज, चंदगडसह अन्य महाराष्ट्रातील गावांना जाणाऱ्या भाविकांना सोडले जात आहे. निपाणी मंडल पोलिस निरीक्षक एस. व्ही. शिवयोगी, निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, सहाय्यक उपनिरीक्षक एस. ए. टोलगी, पी. टी. नरगट्टी, एम. एस. नदाफ, आर. एस. पाटील, के. सी. पाटील, एस. एम. माकने. शिक्षक काशीम जमादार, अण्णासाहेब खोत, सिद्धू मोरे, आशा कार्यकर्त्या लता माने, लक्ष्मी माने, मंगल शेवाळे आधी काम पहात आहेत.

loading image
go to top