पुण्याचा पै गणेश जगताप नागन्नाथ केसरीचा मानकरी

वसंत कांबळे
शनिवार, 5 मे 2018

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त नागन्नाथ तालीम यांच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणेच्या पै.गणेश जगताप ने हिंद केसरी कुस्ती संकुल पुणेच्या पै. समीर देसाईला अस्मान दाखवित नागन्नाथ केसरी किताबाचा मानकरी ठरला.

कुर्डू (सोलापूर)  - महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त नागन्नाथ तालीम यांच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणेच्या पै.गणेश जगताप ने हिंद केसरी कुस्ती संकुल पुणेच्या पै. समीर देसाईला अस्मान दाखवित नागन्नाथ केसरी किताबाचा मानकरी ठरला.

आंतरभारती भाग शाळा कुर्डू शाळेच्या मैदानावर कै. धोंडीबा ढाणे वस्ताद कुस्ती आखाड्यात पार पडलेल्या लढतीत पै. अतुल पाटीलने विजय धुमाळवर विजय मिळविला, पै. अण्णा जगतापने हरियाणाच्या रोहितकुमारवर विजय मिळविला, तर पै. सुनिल शेवतकर शैलेश शेळकेला अस्मान दाखवले, महाराष्ट्र चॅम्पियन सिकंदर शेखने छडी कुमार महाराष्ट्र केसरी अक्षय मंगवडे वर विजय मिळविला.

शिवम ढाणे, शंभू खैरे, विराज गायकवाड, शिवराम गाडे, हर्षराज हांडे, सुरज ढाणे, करण ढाणे या बालमल्लांनी नेत्रदिपक कुस्ती करीत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. आखाड्यात जवळपास २०० कुस्त्यांचा खेळ प्रेक्षकांना पहावयास मिळाला. अण्णासाहेब ढाणे, शहाजी ढाणे, शिवाजी ढाणे, लक्ष्मण आतकर, धनाजी ढाणे, गणेश गायकवाड, सद्दाम शेख, रामचंद्र ढाणे यांनी यावेळी पंचाची जबाबदारी पार पाडली.

आमदार बबनराव शिंदे, जि. प. अध्यक्ष संजय शिंदे, धनराज शिंदे, कुर्डुवाडीचे नगराध्यक्ष समीर मुलाणी, सुरेश बागल, अरुण काकडे, गोविंद पवार, अस्लम काझी, राहुल आवारे, रामलिंग गाडे, रावसाहेब मगर, रामहारी हांडे, चंद्रकांत जगताप, भारत शेळके, प्रकाश उपासे, संजय गुळमे, कुमार भोसले, सोपान लोंढे, चंद्रकांत जाधव, अरुण पाटील, बाळासाहेब जाधव, बाबा जगताप आदी यावेळी उपस्थित होते. कुस्तीचे निवेदन शंकर पुजारी, राजाभाऊ देवकते, वसंत जगताप व शहाजी भोगे यांनी केले. 

Web Title: Ganesh Jagtap Nagnath Kesari