सांगलीत मंगलमूर्ती मोरयाच्या गजरात गणेश जयंती (व्हिडिओ)

सांगलीत मंगलमूर्ती मोरयाच्या गजरात गणेश जयंती (व्हिडिओ)

सांगली -  शहर व जिल्ह्यात गणेश जयंती धार्मिक वातावरणात साजरी झाली. जन्मकाळासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. सांगलीत संस्थान गणपती, मंदिर, विश्रामबागेतील गणेश मंदिर, मिरजेत पटवर्धन मळ्यातील गणेशमंदिर तसेच हरीपूर येथील बागेतील गणपती मंदिरात विशेष सजावट आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. 

सांगलीतील गणपती मंदिरात तीन दिवसांपासून विविध कार्यक्रम सुरु होते. आज महाभिषेकानंतर जन्मकाळ साजरा झाला. फुलांनी सजवलेल्या पाळण्याभोवती महिलांनी गणेशस्तुती गायली. "मंगलमूर्ती मोरया'चा गजर केला. गाभाऱ्यात विशेष रोषणाई केली होती.

सहयोगनगरमध्ये गजानन महाराज सेवा संस्थानच्यावतीने गणेशजयंती साजरी झाली. महाभिषेक, भजन, अथर्वशीर्ष पठण, नामस्मरण व जन्मकाळ झाला. चांदणी चौकात ओम गणेश ट्रस्टतर्फे गणेश याग, नीताताई जोशी यांचे हरिदासी कीर्तन व महाप्रसाद झाला. खणभागात पंचमुखी मारुती रस्त्यावर बुधवारपासून विशेष कार्यक्रम सुरु होते. आज सकाळी होम हवन, दुपारी जन्मकाळ व महाप्रसाद झाला. सायंकाळी हिंदी-मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाला रसिकांनी गर्दी केली. वालचंद महाविद्यालयातील गणेश मंदिरातही धार्मिक कार्यक्रम झाले. 

वड्डी - येथे गजराज ग्रुपने गणेश हनुमान मंदिरात गणेश जयंती साजरी केली. सकाळी पालखी मिरवणुक निघाली. त्यानंतर भजन व जन्मकाळ झाला. मंदिरात चित्तवेधक सजावट केली होती. 

रसुलवाडी - येथे मानमोडी फाट्यावरील स्वयंभू गणेश मंदिरात दर्शनासाठी जिल्हाभरातून भाविकांनी गर्दी केली. एक हजार किलोंहून अधिक बुंदीचे प्रसाद स्वरुपात वाटप झाले. 

मिरज - पटवर्धन मळ्यातील गणेश मंदिरात दुपारी जन्मकाळ झाला. महिला भाविकांनी सजवलेल्या पाळण्यात गणेशाचा जन्मकाळ साजरा केला. फुलांची देखणी सजावट करण्यात आली होती. तळ्यावरील गणेश मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली होती. पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी होती. वखारभागात अरुणोदय गणेश मंदिरावरही रोषणाई केली होती. 

मालगाव - येथील गुरुदेव आश्रम येथे गुरुवारी गणेशपुजन, प्रवचन, सामुदायिक वनभोजन असे कार्यक्रम झाले. आज पहाटे गणेशमूर्तीवर 21 रसांचा महाभिषेक झाला. सकाळी पालखी मिरवणुक व शोभायात्रा निघाली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com