Sangli Police Arrest
esakal
सांगली: अंकली (ता. मिरज) येथे काल निघालेल्या विसर्जन मिरवणुकीत झालेले भांडण सोडवण्यास गेलेल्या तरुणास तिघांनी चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. शीतल धनपाल पाटील (वय २५, अंकली) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तिघांना ग्रामीण पोलिसांच्या पथकाने तत्काळ अटक केली असून एक संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.