जयघोषात तासगावच्या सिद्धिविनायकाचा 243 वा रथोत्सव संपन्न

लोखंडी चाके असलेला हा रथ हजारो भाविक दोराच्या सहाय्याने हाताने ओढत नेत असतात
 Ganeshotasv
Ganeshotasvsakal

तासगाव : गणपती बाप्पा मोरया! मोरया ! मोरया...! च्या जयघोषात आज तासगाव च्या सिद्धिविनायकाचा 243 वा रथोत्सव संपन्न झाला. रथोत्सव साठी राज्यभरातून दोन लाख गणेश भक्त उपस्थित होते. तासगाव च्या पटवर्धन संस्थानच्या श्री गणपती पंचायतन च्या सिद्धिविनायकाचा ऋषी पंचमीला होणारा रथोत्सव राज्यातील गणेश भक्तांचे श्रद्धास्थान आहे. तीन मजली लाकडी कोरीव काम केलेल्या रथातून श्री आपल्या वडिलांना भेटण्यासाठी श्री काशी विश्वेश्वर मंदिरात जातात अशी आख्यायिका आहे. गेली 243 वर्षे पारंपरिक पद्धतीने ही रथयात्रा सुरू आहे. लोखंडी चाके असलेला हा रथ हजारो भाविक दोराच्या सहाय्याने हाताने ओढत नेत असतात. रथामध्ये पटवर्धन संस्थान चे वंशज राजेंद्र पटवर्धन यांच्यासह विविध जाती धर्माचे मानकरी बसलेले असतात.

आज दुपारी सव्वा एक वाजता मंदिरातून पालखी मधून श्रींची पंचधातूची उत्सव मूर्ती आणण्यात आली. गणपतीं ची आरती आणि राष्ट्रगीत झाल्यानंतर प्रचंड उत्साहात आणि मोरया ! मोरया ! च्या जयघोषात रथयात्रा सुरू झाली. रथ ओढणारे हजारो युवक प्रसादाची मागणी करत होते रथातून प्रसादाची उधळण करण्यात येत होती. फुटाफुटाने पुढे सरकत रथ साडे तीन वाजता श्री काशीविश्वेश्वर मंदिर पर्यत पोहोचला. तेथे श्रींची आरती होवून रथ परत मंदिराकडे ओढत आणण्यात आला. रथयात्रा साडे चार तास सुरू होती. रथ माघारी येईपर्यंत भाविकांचा उत्साह कायम होता. रथाचे अधिपत्य राजेंद्र पटवर्धन आणि डॉ अदिती पटवर्धन यानी केले.

रथोत्सवाच्या सुरुवातीला मंत्री शंभूराजे देसाई, खासदार संजय पाटील, राष्ट्रवादीचे युवक नेते रोहित पाटील, भाजपचे युवक नेते प्रभाकर पाटील यानी रथाचे दर्शन घेतले. तहसीलदार रवींद्र रांजणे यांनी पंचनामा करून रथाचा पंचनामा करून रथयात्रेला परवानगी दिली. रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com