पंढरपूर : अल्पवयीन मुलीला दारू पाजून केला 5 जणांनी बलात्कार

अभय जोशी
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

बलात्काराचा व्हिडिओ शेअर होईल या भीतीमुळे पीडितेने ही घटना कोणालाही सांगितली नाही. याचाच फायदा घेत तरुणांनी तिच्यावर अनेकवेळा अत्याचार केला. तिच्याकडे पैशांची मागणीदेखील करण्यात आली. आज पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात पीडित तरुणीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पंढरपूर : अल्पवयीन मुलीला फसवून दारू पाजून पाच नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी पाच पैकी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. ऑक्टोबर 2018 पासून पीडित मुलीवर आरोपींनी वेळोवेळी अत्याचार केला आहे.

या प्रकरणाची पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, की पीडित अल्पवयीन मुलगी 17 वर्षांची आहे. 5 आरोपींपैकी एकाची ती मैत्रिण होती. त्याने तिला पंढरपुरातील अंबाबाई मैदानाजवळील सुलभ शौचालयाजवळ बोलावलं. त्यानंतर पाचही आरोपींकडून तिच्यावर बलात्कारासाठी दबाव टाकण्यात आला. यातील एका आरोपीने तिला छेडलं तर दुसऱ्याने तिला दारू पाजली. त्यानंतर चौघांनी तिच्यावर बलात्कार केला. यात 5 व्या मुलाने सगळ्या प्रकरणाचा व्हिडिओ काढला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करू अशी धमकी आरोपींकडून देण्यात आली.

बलात्काराचा व्हिडिओ शेअर होईल या भीतीमुळे पीडितेने ही घटना कोणालाही सांगितली नाही. याचाच फायदा घेत तरुणांनी तिच्यावर अनेकवेळा अत्याचार केला. तिच्याकडे पैशांची मागणीदेखील करण्यात आली. आज पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात पीडित तरुणीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी तातडीने पाच पैकी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सागर कवडे यांनी दिली.
सामूहिक अत्याचार प्रकरणी 5 आरोपींची नावं-
- मनोज माने
- साहिल सुधीर अभंगराव
- अक्षय दिलीप कोळी
- आरिफ शेख
- माऊली तुकाराम अंकुशराव

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gangraped in pandharpur case filed