‘कचराकुंडीमुक्त सातारा’ संकल्पनेला खो!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

सातारा - शहरातील कचरा उचलण्याचा ठेका असलेल्या साशा कंपनीला काम झेपेना. त्यामुळे साताऱ्यात ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढिगारे झाले आहेत. या ढिगाऱ्यांमुळे ‘कचराकुंडीमुक्त शहर’ या पालिकेच्या संकल्पनेस खो बसला आहे. निम्मे शहर कुंड्यामुक्त झाले असले, तरी अजून निम्मे शहर ओसांडून वाहणाऱ्या कचऱ्यासह कुंडीयुक्त राहिले आहे. 

सातारा - शहरातील कचरा उचलण्याचा ठेका असलेल्या साशा कंपनीला काम झेपेना. त्यामुळे साताऱ्यात ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढिगारे झाले आहेत. या ढिगाऱ्यांमुळे ‘कचराकुंडीमुक्त शहर’ या पालिकेच्या संकल्पनेस खो बसला आहे. निम्मे शहर कुंड्यामुक्त झाले असले, तरी अजून निम्मे शहर ओसांडून वाहणाऱ्या कचऱ्यासह कुंडीयुक्त राहिले आहे. 

ओसांडून वाहणाऱ्या कचराकुंड्या, त्यावर चरणारी मोकट गुरे, कुंडीभोवती असणारे घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य हे चित्र बदलण्यासाठी १२ वर्षांपूर्वी शासनाने कचराकुंडीमुक्त शहर ही संकल्पना पालिकांतून राबविण्याचा निर्णय घेतला. ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी घंटागाड्या सुरू करण्यात आल्या. सुरवातीस चार वॉर्डच्या प्रभागात एक घंटागाडी होती. नंतर हळूहळू घंटागाड्यांची संख्या वाढवत आज प्रत्येक वॉर्डसाठी एक घंटागाडी सुरू आहे. 

ज्या ठिकाणी कचरा निर्माण होतो, तेथूनच थेट कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या सुरू झाल्या. त्यानंतर शहरातील कचराकुंड्या काढण्यात आल्या. पूर्वी रस्त्यांच्या कोपऱ्यांवर, चौकानजीक बांधीव अथवा पाइपच्या कुंड्या होत्या. पालिकेने त्या सर्व पाडून टाकल्या. कॅम्पॅक्‍टर हे वाहन ताफ्यात दाखल झाल्याने त्यासाठी आवश्‍यक लोखंडी कुंड्या पालिकेला घ्याव्या लागल्या. 

साताऱ्यात आज लोखंडी ७० कचराकुंड्या आहेत. या कुंड्या काढून कचराकुंडीमुक्त शहराची संकल्पना प्रत्यक्ष आणण्याचे पालिका प्रशासनाचे मनसुबे आहेत. शहराच्या पश्‍चिम भागातील ३० कचराकुंड्या आतापर्यंत हलविण्यात आल्या. या कुंड्या काढून त्याठिकाणी दंडात्मक कारवाईचे फलक पालिकेने लावले. यापद्धतीने शहरातील सर्व कुंड्या काढून टाकून नागरिकांना घंटागाडीतच कचरा टाकण्यास प्रवृत्त करण्याचे नियोजन आहे. पालिकेच्या या मनसुब्यांना कचरा ठेकेदाराच्या कार्यपद्धतीमुळे सुरूंग लागला आहे. शहरात निर्माण होणारा १०० टक्के कचरा रोजच्या रोज उचलला जात नाही. परिणामी लोकांना कचराकुंड्यात नेऊन कचरा टाकावा लागतो. 
कुंड्याच काढल्यामुळे उघड्यावर कचरा पडून तो इतस्ततः विस्कटण्याचा व त्यातून घाणीचे साम्राज्य अधिक पसरण्याचा धोका आहे. हा धोका लक्षात घेऊन कचरा कुंड्या काढून टाकण्याचे काम संथ करण्यात आले आल्याचे समजते. 

३० टक्के कचरा जातो उघड्यावर 
कचराकुंडीमुक्त शहर या संकल्पनेवर भरपूर खर्च करूनही शासनाला १२ वर्षांत अपेक्षित यश मिळाले नाही. आजही शहरात रोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी ६० ते ७० टक्केच कचरा घंटागाडीमार्फत उचलला जातो. उर्वरित कचरा उघड्यावर, ओढ्यांत फेकला जातो, असे एका खासगी संस्थेच्या पाहणीत आढळून आले आहे.

Web Title: garbage dust bin free satara