पंचगंगा स्मशानभूमीत गॅस दाहिनी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

कोल्हापूर - पंचगंगा स्मशानभूमीत बसविण्यात येणाऱ्या अत्याधुनिक गॅस दाहिनीची माहिती देण्यासाठी या प्रकल्पाचे सादरीकरण आज पदाधिकारी व अधिकाऱ्यांसमोर केले. महानगरपालिकेस बडोदा येथील अल्फा इक्विपमेंट कंपनी मोफत गॅस दाहिनी बसवून देणार आहे. या गॅस दाहिनीसाठी कंपनीचे 32 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

कोल्हापूर - पंचगंगा स्मशानभूमीत बसविण्यात येणाऱ्या अत्याधुनिक गॅस दाहिनीची माहिती देण्यासाठी या प्रकल्पाचे सादरीकरण आज पदाधिकारी व अधिकाऱ्यांसमोर केले. महानगरपालिकेस बडोदा येथील अल्फा इक्विपमेंट कंपनी मोफत गॅस दाहिनी बसवून देणार आहे. या गॅस दाहिनीसाठी कंपनीचे 32 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

अल्फा इक्विपमेंटचे विहंग चव्हाण यांनी गॅस दाहिनीची माहिती दिली. डिझेल व विद्युत दाहिनी यामधील फरक त्यांनी सांगितला. यामध्ये गॅस दाहिनीसाठी कमी खर्च, देखभाल दुरुस्तीसाठीही अत्यल्प खर्च, 10 अश्‍वशक्ती वीज लागते, तसेच विद्युत दाहिनीसाठी 80 किलो वॉट वीज 24 तास लागत असल्याचे सांगितले. गॅस दाहिनी फूल ऍटोमॅटिक, गॅस कंट्रोल पॅनल, हायड्रोलिक ट्रॉली, 20 सिलिंडरचा फोल्डर अशी रचना असणार आहे. या गॅस दाहिनीसाठी कंपनीने पाच वर्षांची वॉरंटी दिली आहे. या प्रकारच्या दाहिन्या गुजरातमधील विविध शहरांत बसविल्याचे सांगितले.

सध्या स्मशानभूमीमध्ये एका अंत्यसंस्कारासाठी 150 किलो लाकूड लागते. यामुळे मोठ्या प्रमाणात रक्षा निर्माण होते; तसेच किमान 1200 ते 1400 रुपये खर्च येतो. गॅस दाहिनीमध्ये मृतदेहांची संख्या वाढेल तसे अंत्यसंस्कारासाठी लागणारा खर्च कमी येतो. राखेचे प्रमाण अत्यल्प असते. लोकभावना लक्षात घेता कंपनीने लाकडावर आधारित दाहिनीही तयार केली आहे. यामध्ये आता लागणाऱ्या लाकडाच्या खर्चात 50 टक्के बचत होणार आहे. महापालिकेच्या कचरा प्रक्रियेपासून निर्माण होणारा ऑरगॅनिक गॅसचा वापर फिल्टर करून यासाठी उपयोगात आणता येईल, असे त्यांनी सांगितले.

सादरीकरण प्रसंगी विरोधी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, ईश्‍वर परमार उपस्थित होते.

बैठकीनंतर महापौर हसीना फरास, स्थायी समिती सभापती डॉ. संदीप नेजदार, महिला बालकल्याण समिती सभापती वहिदा सौदागर, सभागृह नेता प्रवीण केसरकर, उपआयुक्त ज्ञानेश्‍वर ढेरे, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांनी पंचगंगा स्मशानभूमीस भेट देऊन जागेची पाहणी केली.

या वेळी परिवहन स्थायी समिती सभापती नियाज खान, महिला बालकल्याण समिती सभापती सौ. वहिदा सौदागर, गटनेता सुनील पाटील, नगरसेवक राहुल चव्हाण, सचिन पाटील, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, आदिल फरास उपस्थित होते.

गॅस दाहिनीद्वारे अंत्यसंस्कार ऐच्छिक बाब असावी - महापौर
महापौर हसीना फरास यांनी सांगितले की, 'पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी गॅस दाहिन्या आवश्‍यक आहेत; पण गॅस दाहिनीत अंत्यसंस्कार करणे ही ऐच्छिक बाब असणार आहे. मृताच्या नातेवाइकांनी इच्छा व्यक्त केल्यासच गॅस दाहिनीत अंत्यसंस्कार केले जातील. याबाबत सक्ती करू नये. लोकांना पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करायचे असतील तर तशी मुभा राहणार आहे.''

Web Title: gas dahini in Panchaganga crematorium