Sangli News: सांगलीत गॅस गळतीमुळे भीषण स्फोट; महापालिकेचे 4 कर्मचारी जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gas leak explosion in Sangli

आगीत चार घरे भस्मसात झाली. तर गॅस टाकी फुटल्यामुळे अन्य दोन घरांचेही नुकसान झाले.

सांगलीत गॅस गळतीमुळे भीषण स्फोट; महापालिकेचे 4 कर्मचारी जखमी

सांगली : सांगलीतील (Sangli) पंचशीलनगरमधील मेंडगुले प्लाॅटमध्ये आज दुपारी एका पत्र्याच्या बंद घरात गॅस गळती (Gas Leak) होऊन लागलेल्या आगीनंतर भीषण स्फोट झाला. या आगीत चार घरे भस्मसात झाली. स्फोटानंतर गॅस टाकी फुटल्यामुळे अन्य दोन घरांचेही नुकसान झाले. आग आटोक्यात आणताना महापालिका अग्निशमन दलाचे चौघेजण जखमी झाले. यापैकी एकजण 25 टक्के भाजला.

अधिक माहिती अशी, पंचशीलनगर रेल्वेलाईन जवळ मेंडगुले प्लाॅटमध्ये झोपडपट्टी वजा पत्र्याची चाळ आहे. चाळीतील नंदकुमार जावीर यांच्या घरातील सिलिंडर टाकीतून गॅस गळती होऊन आग लागली. शेजारील चार घरात कोणी नव्हते. पत्र्याच्या घरातून धूर व आग येऊ लागताच नागरिकांनी अग्निशमन दलाला काॅल केला. तत्काळ चार गाड्या दाखल झाल्या.

हेही वाचा: Govind Pansare Case; पानसरे हत्या प्रकरणी 2 मार्चला पुढील सुनावणी

आग आटोक्यात आणताना पेटलेल्या सिलिंडरचा स्फोट झाला. पाठोपाठ आग पसरली. तेव्हा फायरमन रामचंद्र चव्हाण हे 25 टक्के भाजले. मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार, सुनिल माळी, दशरथ पवार, कृष्णराव मोरे हे चौघे किरकोळ जखमी झाले. जवान व नागरिकांनी प्रसंगावधान राखून चार घरातील सात सिलिंडर बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. महापालिकेच्या चार गाड्यांनी पाऊण तासात आग आटोक्यात आणली. आगीमध्ये चार घरे भस्मसात होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले. संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.दरम्यान आगीमुळे झालेल्या स्फोटाच्या आवाजाने परिसरातील नागरिकांची पळापळ झाली होती. नंतर घटनास्थळी गर्दी जमली होती.

Web Title: Gas Leak Explosion Four Nmc Employees Injured Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sangligasgas explosion