सोलापूर स्मार्ट सिटीत पाईपद्वारे गॅसचे वितरण 

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

सोलापूर : शहरातील घर, उद्योग आणि व्यावसायिकांना पाईपजोडणीद्वारे गॅस पुरविण्याचा प्रकल्प आयएमसी कंपनीतर्फे उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका परिवहन उपक्रमाच्या बुधवार पेठ डेपोतील एक एकर जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पाईपलाईनद्वारे गॅस पुरविण्याचा हा पहिलाच प्रकल्प असणार आहे. 

सोलापूर : शहरातील घर, उद्योग आणि व्यावसायिकांना पाईपजोडणीद्वारे गॅस पुरविण्याचा प्रकल्प आयएमसी कंपनीतर्फे उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका परिवहन उपक्रमाच्या बुधवार पेठ डेपोतील एक एकर जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पाईपलाईनद्वारे गॅस पुरविण्याचा हा पहिलाच प्रकल्प असणार आहे. 

आयएमसी या कंपनीने सिटी गॅस वितरणासाठी बुधवार पेठ डेपोतील जागा योग्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम ऍन्ड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डाने सोलापूर जिल्ह्यासाठी शहरासाठी गॅस वितरणाची अधिकृत मान्यता दिली आहे. त्यानुसार कंपनीने घरगुती, उद्योग आणि व्यावसायिकांना पाईपद्वारे गॅस वितरणाची यंत्रणा निर्माण करण्याचा मानस व्यक्त केला आहे. 

गॅस वितरणाच्या माध्यमातून सोलापूर शहर व जिल्हा प्रदूषणमुक्त करणे अथवा प्रदूषण कमी करणे, शहर व जिल्ह्यातील कुटुंबियांना, उद्योजकांना, व्यावसायिकांना स्वच्छ, स्वस्त, कार्यक्षम व सुरक्षीत सीएनजी पुरवठा करणे हा या मागील प्रमुख उद्देश आहे. गॅसवर आधारीत इकॉनॉमी व नॅचरल गॅसचा प्रायमरी उर्जामधील सहभाग हा 6.5 टक्‍क्‍यांवरून 15 टक्‍क्‍यांपर्यंत वाढविण्याचा भारत सरकारचा संकल्प आहे. तो या प्रकल्पामुळे पूर्ण होण्यास मदत होणार आहे. त्यास अनुसरूनच हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. 

भिस्त सर्वसाधारण सभेच्या निर्णयावर 
स्मार्ट सिटीच्या दृष्टीने अतिशय चांगला ठरणाऱ्या या प्रकल्पास जागा देण्यास परिवहन समितीने एकमताने मंजुरी दिली आहे. आता सर्वसाधारण सभेत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. कोणत्याही चांगल्या प्रकल्पाला विशिष्ट "हेतू' ठेवून विरोध करण्याची आणि ते प्रकल्प रखडविण्याची सोलापूर महापालिकेतील सत्ताधाऱ्यांची परंपरा आहे. प्रदुषणमुक्त भारत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. महापालिकेत भाजपचीच सत्ता आहे. त्यामुळे ते या विषयाबाबत निर्णय घेतात की, "अमृत'ची अभिलाषा ठेवून सोलापूरकरांच्या स्वप्नांत "विष' मिसळतात हे लवकरच स्पष्ट होईल. 

Web Title: gas pipeline in solapur smart city