कोयना धरणाचे दरवाजे दुपारी उघडणार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

कोयना धरणातून आज दुपारी एक वाजता वक्र दरवाजा उघडण्यात येण्याची शक्यता आहे, असे कोयना सिंचन विभागाने कळवले आहे. 

कोयनानगर (सातारा) : कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. धरणाचा पाणीसाठा 88 टीएमसीपर्यंत पोचला आहे. त्यामुळे धरणातून आज दुपारी एक वाजता वक्र दरवाजा उघडण्यात येण्याची शक्यता आहे, असे कोयना सिंचन विभागाने कळवले आहे. 

सकाळी सकाळी सात वाजेपर्यंत पर्यंत महाबळेश्वर 213,  नवजा 155 मिलीमीटर पाऊस झाला आहे. धरणात पाण्याची आवक 64400 क्युसेक झाली आहे. धरणाचा पाणीसाठा 88 टीएमसी झाला आहे. धरणातून दुपारी एक वाजता वक्रद्वारातून सांडव्यावरून आज 15 ते  20 हजार क्युसेक विसर्ग सोडण्याची श्यक्यता आहे. विसर्गात वाढ होऊ शकते, असा अंदाज कोयना सिंचन विभागाने व्यक्त केला..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gates of Koyna dam will be open in afternoon