esakal | सांगलीतील नागठाणे-वाळवा गावांच्या वेशीवर  गव्याचे दर्शन
sakal

बोलून बातमी शोधा

gawa fund in sangli nagthane maharashtra

भितीने गाळण उडालेला अमोल आपली दुचाकी तिथेच टाकून पळून आला

सांगलीतील नागठाणे-वाळवा गावांच्या वेशीवर  गव्याचे दर्शन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाळवा : नागठाणे-वाळवा गावांच्या वेशीवर आज धष्टपुष्ट गव्याचे दर्शन झाल्याने हा भाग दहशतीच्या सावटाखाली आहे. शेतकऱ्यानी दोन गवे दिसल्याचे सांगितले. सायंकाळी तुटलेल्या उसाचा फड पेटविण्यासाठी गेलेल्या येथील कोटभागातील अमोल कोकाटे या तरुणाला गव्याने हुसकावून लावले. 

दरम्‍यान भितीने गाळण उडालेला अमोल आपली दुचाकी तिथेच टाकून पळून आला. त्याने दोन बलाढ्य गवे पाहिले. त्याने या भागात इतर लोकांना गवे दिसल्याचे सांगितले. नंतर मात्र गवे उसाच्या पिकात गले. या भागात उसाचे पिक मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय मोठा ओढा आहे.

हे पण वाचा जिवलग मित्र धनंजय मुंडेंवर होणाऱ्या बलात्काराच्या आरोपावर अमोल कोल्हेंनी केलं मोठं वक्तव्य 

ओढ्याच्या बाजूला बाभळीच्या झाडाची गर्दी आहे. या भागात गवे कोठून आले याबाबत कोणालाही माहीती नाही. दैनंदिन कामकाजाचा भाग म्हणून या भागात शेतकरी रात्री अपरात्री शेतात जातात. गतवर्षी या भागाच्या पुर्वेला जुन्या आष्टा रस्यांवर एक गवा आढळून आला होता. 

संपादन - धनाजी सुर्वे 

loading image