Ginger Crop
Ginger Cropesakal

Ginger Crop : 'या' पिकानं शेतकऱ्यांना बनवलं कोट्यधीश; ऊस, द्राक्ष, आंबा, पपई, डाळिंब, ड्रॅगन फ्रुटच्या क्षेत्रातही मोठी वाढ

यंदा आले पिकाला उच्चांकी दर मिळाल्याने येथील शेतकऱ्यांनी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत.
Published on
Summary

ताकारी व टेंभू योजनेचे पाणी तालुक्यात सर्वत्र आल्याने येथील बागायती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

कडेगाव : एकेकाळी दुष्काळी अशी ओळख असलेला कडेगाव तालुका आता ताकारी, टेंभू सिंचन योजनांचे (Tembu Irrigation Scheme) पाणी आल्याने येथे बागायती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे ऊस, द्राक्ष, ड्रॅगन फ्रुट, आंबा, भाजीपाला आदी पिकांचे उत्पादन येथे मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

यंदा आले पिकाला (Ginger Crop) उच्चांकी दर मिळाल्याने येथील शेतकऱ्यांनी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत. ताकारी व टेंभू योजनेचे पाणी तालुक्यात सर्वत्र आल्याने येथील बागायती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तेव्हा येथे ऊस, द्राक्ष, आल, आंबा, ड्रॅगन फ्रुट, पपई, डाळिंब, भाजीपाला आदी पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे.

Ginger Crop
Bedag : बाबासाहेबांच्या नावाची कमान पाडणाऱ्या गावात मोठा ठराव; विरोधात निकाल जाताच ग्रामसभेतून आंबेडकरी समाज पडला बाहेर

तसेच उसाच्या क्षेत्रातही विक्रमी वाढ झाली आहे. येथील उसाचे उत्पादन लक्षात घेऊन तालुक्यात दोन साखर कारखाने सुरू झाले. कारखान्याकडून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत असल्याने परिणामी हुकमी मानल्या जाणाऱ्या उसाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर तालुक्यात आले, ड्रॅगन फ्रुटच्या क्षेत्रातही वाढ होत आहे.

तालुक्यातून ड्रॅगन फ्रुटची निर्यात होत आहे. या दोन्ही पिकांना चांगला दर मिळत असल्याने उसाला पर्याय म्हणून शेतकरी आता या पिकाकडे वळला आहे. या दोन्ही पिकांच्या उत्पादनातून येथील काही शेतकरी कोट्यधीश झाले आहेत.

Ginger Crop
Gokul Dudh Sangh : 'गोकुळ' अध्यक्षांचा शौमिका महाडिकांवर पलटवार; 'महाडिकांनी फक्त राजकीय हेतूनंच तसं केलंय'

आता तालुक्यातील बहुतांश शेतकरी आधुनिक पद्धतीने व प्रयोगशील शेती करून उच्चांकी उत्पादन घेत आहेत. त्यामुळे तालुक्यात ठिकठिकाणी कृषी मॉल सुरू झाले आहेत. यामध्ये औषध फवारणी पंप, विविध कृषी उपकरणे, छोटे ट्रॅक्टर, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, पीव्हीसी पाइप आदी शेतीपयोगी साधने मिळत आहेत. कृषी सेवा केंद्रांतून खते, बी-बियाणे व औषधे मिळतात. त्यामुळे अशा शेतीपूरक व्यवसायांतूनही मोठी आर्थिक उलाढाल होत आहे.

Ginger Crop
Hasan Mushrif : शरद पवारांनी भाजपला आव्‍हान देताच मुश्रीफ म्हणाले, 'त्यातही आम्हाला क्‍लीन चिट मिळणार'

तालुक्यात सिंचन योजनांचे पाणी आल्याने हरित क्रांती झाली. पशुपालन व दुग्ध व्यवसाय करण्यास सुरवात केली आहे. तालुक्यातून प्रतिदिन ३५ ते ४० हजार लिटर दूध उत्पादन होत आहे. काही शेतकऱ्यांनी मुक्त संचार गोठा करून आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे. दरडोई उत्पन्नही वाढल्याने दुचाकी-चारचाकीसह कृषी अवजारे शेतकरी खरेदी करत आहेत.

शेतकऱ्यांनी पारंपरिकऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती करावी, तसेच नवनवे प्रयोग करावेत. ड्रॅगन फ्रुट, आल्यासह बाजारपेठेचा अभ्यास करून भाजीपाला आदी पिके घ्यावीत. शेतकऱ्यांनी अभ्यासपूर्ण व चिकित्सक शेती केल्यास आर्थिक उत्पन्न निश्चित मिळते.

-आनंदराव पवार, प्रगतशील ड्रॅगन फ्रुट उत्पादक, तडसर

Ginger Crop
Maratha Reservation : अतिरेक झाला की उद्रेक होणारच, मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका; उदयनराजेंचा सरकारला कडक इशारा

तालुक्यातील पिके व क्षेत्र (हेक्टरमध्ये)

  • ऊस १८ हजार ५९२

  • द्राक्ष १४५

  • आले २३०

  • आंबा ६०

  • ड्रॅगन फ्रुट २५

  • भाजीपाला २४०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com