Hasan Mushrif : शरद पवारांनी भाजपला आव्‍हान देताच मुश्रीफ म्हणाले, 'त्यातही आम्हाला क्‍लीन चिट मिळणार'

'ज्या ठिकाणी शरद पवारांची सभा झाली, त्या ठिकाणी सभा घेवून उत्तर द्यायचे नाही'
Hasan Mushrif vs Sharad Pawar
Hasan Mushrif vs Sharad Pawaresakal
Updated on: 
Summary

'लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. यातून काही निघाले तरी गोकुळला क्‍लीन चिट मिळेल.'

कोल्‍हापूर : ‘राज्य बँक, सिंचन घोटाळ्यात क्‍लीन चिट मिळाली आहे. तसेच गोकुळच्या (Gokul Dudh Sangh) चाचणी लेखापरीक्षणातूनही काहीही निघणार नाही. आणि त्यातूनही जरी काही निघाले तर त्यातही क्‍लीन चिट मिळेल’, असा विश्‍‍वास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी व्यक्‍त केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

ज्येष्‍ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्य बँक व सिंचन घोटाळ्याची (Irrigation Scam) चौकशी करण्याचे भाजपला (BJP) आव्‍हान दिले आहे. यावर बोलताना मुश्रीफ म्‍हणाले, ‘या दोन्‍ही प्रकरणांची चौकशी झाली आहे. त्यामध्ये क्‍लीन चिट देण्यात आली असल्याने चौकशीचा काही प्रश्‍‍नच उद्भवत नाही. याच पध्‍दतीने गोकुळमध्येही काही होणार नाही.

Hasan Mushrif vs Sharad Pawar
Gokul Dudh Sangh : 'गोकुळ' अध्यक्षांचा शौमिका महाडिकांवर पलटवार; 'महाडिकांनी फक्त राजकीय हेतूनंच तसं केलंय'

मुळात लेखापरीक्षणाची काहीच गरज नाही. तरीही लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. यातून काही निघाले तरी गोकुळला क्‍लीन चिट मिळेल. मुश्रीफ पुढे म्‍हणाले, ‘राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने धोरण ठरवले आहे की, ज्या ठिकाणी शरद पवार यांची सभा झाली, त्या ठिकाणी सभा घेवून उत्तर द्यायचे नाही. त्यामुळे टीकाटिप्‍पणीपेक्षा जिल्‍ह्यातील प्रश्‍‍नांना १० सप्‍टेंबरच्या सभेत महत्‍व असेल.

Hasan Mushrif vs Sharad Pawar
Jalna Maratha Andolan : 'मराठा समाजाला डिवचाल तर हिशेब चुकता करू'; पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे कोल्हापुरात पडसाद

पंतप्रधान नरेंद मोदी यांनी साडेनऊ वर्षात सर्वसामान्य जनतेच्या मनावर अधिराज्य केले आहे. त्यामुळे विरोधातील मंडळी एकत्र येवून लढण्याचा प्रयत्‍न करत आहेत. लोकशाहीत सत्ताधारी, विरोधक असणार आहेत. त्यांच्या परीने ते प्रयत्‍न करत आहेत. मात्र भाजपविरोधात त्यांना यश मिळणार नाही.’

Hasan Mushrif vs Sharad Pawar
Kolhapur NCP Sabha : जंगी स्वागत, भव्य रॅली.. कोल्‍हापुरात अजितदादांची सभा होणार रेकॉर्ड ब्रेक; मंत्री हसन मुश्रीफांना विश्‍‍वास

दरम्यान, ‘भाजपची शिवसेना (शिंदे गट), राष्‍ट्रवादीसोबत झालेली आघाडी आवडली नसल्याचे मत मंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी व्यक्‍त केले आहे. मुनगंटीवार यांनी हे बोलण्यापूर्वी मोदी-शहा अशी युती करण्यासाठी का प्रयत्‍न करत आहेत, याचा विचार करावा’, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Hasan Mushrif Satej Patil Gokul election Kolhapur
Satej Patil on Hasan Mushrif Gokul Election
Hasan Mushrif vs Dhananjay Mahadik
Kolhapur Gokul Election
Marathi News Esakal
www.esakal.com