येरवळेच्या गिरीष यादवने रोवला युपीएसीत झेंडा 

upsE.jpg
upsE.jpg

कऱ्हाड : केवळ शहरी भागातीलच मुले युपीएससीत पास होण्याचे प्रमाण जास्त असते हा अनेक वर्षांचा आलेख आहे. मात्र त्याला छेद देत ग्रामीण भागातीलही युवक युपीएससी परिक्षेत यश मिळवु शकतात हे येरवळे (ता.कऱ्हाड, जि.सातारा) येथील गिरीश अशोकराव यादव याने सिध्द करुन दाखवले आहे. सलग दोनवेळा अपयश येवुनही त्याने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर फिनीक्स भरारी घेत युपीएसी परिक्षेत यश मिळवुन स्वतःचे कर्तुत्व सिध्द केल आहे. देशातील युपीएससीच्या गुणवत्ता यादीत येवुन त्याने आयपीएस केडरमध्ये बाजी मारली आहे.    

पहिल्यापासुनच शांत, संयमी आणि हुशार असणाऱ्या गिरीषचे माध्यमिक शिक्षण तांबवे (ता.कऱ्हाड) येथील आण्णा बाळा पाटील विद्यालयात झाले. त्यानंतर त्याचे महाविद्यालयीन शिक्षण येथील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात झाले. त्यानंतर त्याने पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीटेक इलेक्ट्रीकलचे शिक्षण पुर्ण केले. ते करत असतानाच गिरीषने युपीएसी करायचे ठरवले.

आई-वडील दोन्ही उच्चशिक्षीत असल्याने त्याला घरीच चांगले मार्गदर्शन झाले. त्यानुसार त्याने पुणे येथे गेल्या तीन वर्षापासुन अभ्यासक्रम सुरु केला होता. त्याने पहिल्यांदा 2016 साली युपीएसीची परिक्षा दिली. त्यामध्ये त्याला अपयश आले. मात्र त्या अपयशाने खचुन न जाता त्यालाच संधी मानुन गिरीषने पुन्हा मोठ्या जोमाने अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने 2017 मध्येही युपीएससीची परिक्षा दिली. त्यामध्येही त्याला अपयश आले. मात्र त्याने मोठ्या जिद्दीने 2018 मध्ये पोस्ट काढायचीच या इराद्याने अभ्यास करुन परिक्षा दिली. दिवसरात्र अभ्यास करुन मोठ्या जिद्दीने त्याने तिसऱ्यावेळी फिनीक्स भरारी घेत यश मिळवले. ग्रामीण भागातील विद्यार्थीही युपीएससी परिक्षेत बाजी मारु शकतात हेच त्याने यातुन सिध्द करुन दाखवले आहे. देशभरातुन 759 उमेदवारांची निवड झाली असुन गिरीषचे रँकींग 220 वे आहे. त्याची आयपीएस केडरसाठी निवड झाली आहे. त्याला आयकर उपायुक्त संग्राम जगदाळे, कोल्हापुरचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी मार्गदर्शन केले. त्याचा यशामध्ये त्याचे आई-वडील, बहिणी, आजी-आजोबा, मामा आणि कुटुबीयांचाही मोठा वाटा आहे. त्याच्या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्याचे अभिनंदन केले. 

''ग्रामीण भागातील तरुणांनी युपीएससी, एमपीएसी परिक्षांना सामोरे गेले पाहिजे. ते आपल्याला जमणार नाही हे पहिल्यांदा डोक्यातुन काढुन टाकले पाहिजे. सातत्याने अभ्यास, जिद्द आणि चिकाटीने हे यश साध्य करता येते हे मी स्वतः सिध्द केले आहे. प्रशासनात काम करण्यासाठी देशात, राज्यात अनेक संधी आहेत. त्याच सोनं करण्याचे काम तरुणांनी या स्पर्धा परिक्षांना सामोरे जावुन केले पाहिजे.''
- गिरीश अशोकराव यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com