दहावीच्या विद्यार्थिनीची पाडेगावात आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

लोणंद - पाडेगाव (ता. खंडाळा) येथील पायल जिजाबा ननावरे (वय 16, रा. आंबेडकर कॉलनी) या इयत्ता दहावीतील विद्यार्थिनीने राहत्या घरी साडीच्या साहाय्याने सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. पायल ही नीरा (ता. पुरंदर) येथील लीलावती शहा विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होती. पायलची आई व तिचा भाऊ नीरा येथे बाजारासाठी गेले होते. त्या वेळी पायल एकटीच घरी होती. तासाभरानंतर आई व भाऊ निखिल बाजार करून परतल्यावर घराचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ दरवाजा वाजवूनही दरवाजा न उघडल्याने आसपासच्या लोकांच्या मदतीने निखिलने दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केल्यावर पायलने गळफास घेतल्याचे दिसले. तिला तातडीने लोणंद येथे उपचारासाठी रुग्णालयात आणले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. याबाबत वैशाली जिजाबा ननावरे यांनी लोणंद पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.
Web Title: Girl Student Suicide