थकीत एफआरपीवर 12 टक्के व्याज द्यावे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

सांगली - केंद्र सरकारने जाहीर केलेल्या "एफआरपी'च्या पायाभूत उताऱ्यात "बेस' बदलल्याने प्रतीटनामागे 600 ते 700 रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे, दहा बेस पकडण्याऐवजी 9.5 बेस पकडूनच एफआरपी जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. एफआरपी देण्यास विलंब करणाऱ्यांना बारा टक्क्यांनी व्याज द्यावे, अशी मागणी आहे. 

निवेदनात म्हटले आहे, की दहा बेस पकडून प्रतीटन दोन हजार 750 रुपये दर होतो. 11 उतारा झाल्यास यात 289 रुपये, तर 11.5 झाल्यास 145 रुपये धरून एकूण प्रतीटन दर तीन हजार 184 रुपये दर होतो. हाच दर 9.5 प्रमाणे धरल्यास दोन हजार 750 व 10.5 रिकव्हरी झाल्यास 289 रुपये तसेच 11.5 उताऱ्यांला प्रतीटन तीन हजार 328 रुपये मिळतात. मात्र, यात सरकारने चालाखी केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा तोटा झाला आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे 9.5 बेस पकडूनच दर जाहीर करावा, अशी मागणीही आहे. यासह एफआरपीची रक्कम 14 दिवसांत दिलेली नाही, त्या सर्व साखर कारखान्यांनी 12 टक्‍क्‍यांप्रमाणे व्याजदर दिलाच पाहिजे, अशीही मागणी केली आहे.

Web Title: Give 12 percent interest on the pending FRP