पाेलिसांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 एप्रिल 2020

जिल्ह्याच्या सर्व सीमा सील केलेल्या असतानाही नजर चुकवून मुंबई-पुणे व अन्य शहरातून लोक गावी येत आहेत. त्यांच्यासह इतरांच्याही आरोग्यासाठी ही गंभीर बाब असून, अशा प्रकारांबाबत कडक कारवाईच्या सूचना दिल्याचे जिल्ह्याच्या सर्व सीमा सील केलेल्या असतानाही नजर चुकवून मुंबई-पुणे व अन्य शहरातून लोक गावी येत आहेत. त्यांच्यासह इतरांच्याही आरोग्यासाठी ही गंभीर बाब असून, अशा प्रकारांबाबत कडक कारवाईच्या मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

ढेबेवाडी (जि.सातारा) : लॉकडाउनमध्ये परवाना प्राप्त दारू दुकाने सील केलेली असतानाही चोरट्या मार्गाने होणारी दारूची विक्री ही गंभीर बाब असून, त्यावर कडक कारवाईचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती गृह व उत्पादन शुल्क राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी येथे दिली. 

मंत्री देसाई यांनी येथील ग्रामीण रुग्णालयासह विभागातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील उपाययोजनांची माहिती घेतली. रुग्णांची काळजी घेताना स्वतःच्याही आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, काळजी घ्या, असा सल्ला त्यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना या वेळी दिला. "दै. सकाळ'च्या मंगळवारच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या "ग्रामीण भागात बाटल्यांनाच फुटले पाय' या मथळ्याखालील बातमीकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ""हा प्रकार समोर आल्याबरोबर त्यावर कडकातील कडक ऍक्‍शन घेण्याचे आदेश उत्पादन शुल्कच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. बार व दारू दुकाने सील असताना गैरमार्गाने सुरू असलेले असे प्रकार तत्काळ रोखण्यासाठी आता कडक पाऊले उचलली जात आहेत. 

सध्याच्या परिस्थितीत पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण आहे. 14- 14 तास पोलिस ऑनड्युटी रस्त्यावर उभे आहेत. जनतेची सुरक्षा व आरोग्यासाठी कष्ट घेत असलेल्या या मंडळींना विनाकारण त्रास देऊन त्यांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रयत्न कुणी केल्यास तो खपवून घेतला जाणार नाही. जिल्ह्यात आरोग्य विभागाकडे पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. विविध आरोग्य केंद्रे व सरकारी रुग्णालयांना पूर्व कल्पना न देता भेट देऊन तेथील उपचार सुविधांची माहिती घेतली आहे. प्रत्येक ठिकाणी मला सतर्कता आढळून आली.'' 

चक्क कोरोना संशयितासमवेतच डोहाळ जेवण

Coronavirus : मरकजच्या सर्व सातारकरांचे रिपाेर्ट आले हाे...

लाकडे जमविण्यापासून ते सरण रचण्यापर्यंत प्रशासनाला कसरत करावी लागली. अंत्यसंस्कार गाडीसाठीही बराच वेळ खोळंबा झाला. सविस्तर वाचा या लढ्याविषयी 

 

जिल्ह्याच्या सर्व सीमा सील केलेल्या असतानाही नजर चुकवून मुंबई-पुणे व अन्य शहरातून लोक गावी येत आहेत. त्यांच्यासह इतरांच्याही आरोग्यासाठी ही गंभीर बाब असून, अशा प्रकारांबाबत कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. 

शंभूराज देसाई, उत्पादन शुल्क राज्यमंत्री 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give Moral Support To Police Department Says Minister Shamburaj Desai