Coronavirus : मरकजच्या सर्व सातारकरांचे रिपाेर्ट आले हाे...

Coronavirus : मरकजच्या सर्व सातारकरांचे रिपाेर्ट आले हाे...

सातारा : निजामुद्दीन येथील मरकजसाठी गेलेल्या सातारा जिल्ह्यातील  38 नागरिकांचे कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तरी नागरीकांनी भिती न बाळगता दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

निजामुद्दीन येथील "मरकज" या धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेल्या देशातील विविध ठिकाणच्या नागरिकांना कोरोनाची (कोविड-19) बाधा झाली आहे. सातारा जिल्ह्यातील जे 38 नागरिक मरकजसाठी गेले होते. त्या सर्वांच्या स्त्रावांचे नमुने एन. आय. व्ही. पुणे येथे पाठविले होते. त्या सर्वांचेही रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तथापि आरोग्य विभागाच्या मार्गदर्शन सुचना नुसार त्यांना संस्थात्मक अलगीकरण (क्वॉरंटाईन) मध्ये ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली. 

प्रशासन वेळच्यावेळी प्रसार माध्यमांद्वारे वस्तूनिष्ठ माहिती देत आहे. त्यामुळे जनतेनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनानी ज्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. त्या काटेकोरपणे पाळाव्यात. या काळात घरात बसून प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक देणे हेच सर्वांकडून अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

लाकडे जमविण्यापासून ते सरण रचण्यापर्यंत प्रशासनाला कसरत करावी लागली. अंत्यसंस्कार गाडीसाठीही बराच वेळ खोळंबा झाला. सविस्तर वाचा या लढ्याविषयी 

दरम्यान जिल्हा रुग्णालय, सातारा येथे कोरोना बाधित रुग्णाच्या निकट सहवासित असलेल्या 8 ते 70 वर्ष वयोगटातील 11 पुरुष व 4 महिला अशा 15 नागरिकांना आज विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले.
कृष्णा हॉस्पिटल, कराड येथे कोरोना बाधित निकट सहवासित असणाऱ्या 1 ते 80 वर्ष वयोगटातील 31 पुरुष व 17 महिला असे एकूण 48 नागरिकांना व 1 ते 23 वर्ष वयोगटाती 3 महिलांना श्वसन संस्थेच्या तीव्र जंतुसंसर्गामुळे विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्व 66 अनुमानितांच्या घशातील स्त्रावाचे नमुने  बी.जे. महाविद्यालय, पुणे  येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. आमोद गडीकर यांनी कळविले आहे.

Video : त्या ठणठणीत अन् घरी परतल्याही; नवीन 18 संशीयत दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com