बहिणीला द्या ‘मधुरांगण सभासदत्वा’ची भेट!

बहिणीला द्या ‘मधुरांगण सभासदत्वा’ची भेट!

सातारा  - महिलांच्या कलागुणांना, त्यांच्यातील नेतृत्व क्षमतेला वाव देणाऱ्या, अल्पावधीतच समस्त महिला वर्गाचे व्यासपीठ बनलेल्या ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘मधुरांगण’ क्‍लबची नोंदणी सुरू झाली आहे. रविवारी (ता. २६) रक्षाबंधन आहे. त्यानिमित्त तुम्ही आपल्या बहिणींना ‘मधुरांगण’च्या सभासदत्वाची अनोखी भेट देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करू शकता. 

आरोग्य, अर्थ, फॅशन, पर्यटन आदी वैविध्यपूर्ण क्षेत्रांची ओळख महिलांना व्हावी, त्यांना या क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधता यावा, या क्षेत्राचा पुरेपूर आस्वाद घेता यावा, त्यांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागावा, या हेतूने ‘मधुरांगण’तर्फे विविध उपक्रम राबविले जातात. सभासदांसाठी सहलींचे नियोजन केले जाते. ‘मधुरांगण’तर्फे होणाऱ्या वैविध्यपूर्ण कार्यक्रमांमुळे हजारो महिला या उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत. ‘मधुरांगण’तर्फे यंदाही असे विविध कार्यक्रम होणार आहेत. 

‘सकाळ’च्या सातारा, कऱ्हाड, फलटण या कार्यालयांत ‘मधुरांगण’ची सदस्य नोंदणी सुरू आहे. केवळ ४०० रुपये भरून ‘मधुरांगण’चे सभासद होता येईल. सभासद नोंदणी केल्यानंतर ८५० रुपयांचा १२ पिसेसचा डिनर सेट भेट दिली जाणार आहेत. त्याशिवाय सभासदांना वर्षभर लकी ड्रॉद्वारे आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध राहणार आहे, तसेच भरभरून फ्री कूपन, डिस्काउंट ऑफरही असणार आहेत. रक्षाबंधनानिमित्त तुमच्या प्रिय बहिणीस ‘मधुरांगण’च्या सभासदत्वाची आगळीवेगळी भेट देऊ शकता.

‘सकाळ’च्या विविध कार्यालयांत नोंदणी सुरू
सातारा कार्यालय - 
रजत सागर कॉम्प्लेक्‍स, पहिला मजला, पोवई नाका, सातारा. 
संपर्क - चित्रा भिसे (९९२२९ १३३५८) 

कऱ्हाड कार्यालय - 
१६६ ए, शनिवार पेठ, हेड पोस्ट शेजारी, कऱ्हाड.
संपर्क - नयन लोकरे (७२७६२ ८६७६९) 

फलटण कार्यालय : 
आयडीबीआय बॅंकेशेजारी, लक्ष्मीनगर, फलटण.
संपर्क - भारती शिंदे (७७७४० ५०२०९) 
तसेच शहरातील अन्य नोंदणी केंद्रावरही नोंदणी करता येईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com