esakal | बेळगावात गोवा बनावटीची दारु पकडली; पुण्यातील 2 जण अटकेत
sakal

बोलून बातमी शोधा

दारु

बेळगावात गोवा बनावटीची दारु पकडली; पुण्यातील 2 जण अटकेत

sakal_logo
By
अमृत वेताळ

बेळगाव : गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करण्यात मोटारीवर कारवाई करून पुणे येथील दोघाना अटक करण्यात आली आहे. बुधवार (१) अबकारी अधिकाऱ्यांनी मजगाव क्रॉसनजिक ही कारवाई केली असून त्यांच्याकडून ५ लाख रुपये किमतीची मोटार, १ लाख ८३ हजार रुपये किमतीची दारू असा एकूण ८ लाख ८३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा: बैलगाडा शर्यतींचा 'धुरळा' उडणार

सलीम अबूबकर शेख (वय ३९) आणि पृथ्वीराज विनायक चव्हाण (वय ३१ दोघेही रा. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. गोवा बनावटीच्या दारूची चोरटी वाहतूक करण्यात येणार आहे. अशी खात्रीलायक माहिती अबकारी अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार काल मजगाव क्रॉस येथे सापळा रचून वाहनांची तपासणी करण्यात येत होती.

बेळगावच्या दिशेने येणारी मोटार संशयाने अडवली असता त्यामध्ये सुमारे १ लाख ८३ हजार रुपये किमतीचे ५४.९०० लिटर गोवा बनावटीची मद्य आढळून आले. त्यामुळे वरील दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दारूसह ५ लाख रुपये असा एकूण ८ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अबकारीचे अप्पर आयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ, अबकारी उपायुक्त जयरमेगौडा, अबकारी उपअधीक्षक सी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अबकारी उपायुक्त कार्यालयातील निरीक्षक सी. एस. होसल्ली व त्यांच्या सहकऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

हेही वाचा: तब्बल 18 गावठी बॉम्ब सापडल्याने खळबळ; एकाला अटक

loading image
go to top