पंढरपुरात देवाचे चांदीचे मुखवटे चोरीला

अभय जोशी 
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

पंढरपूर (सोलापूर) : येथील चंद्रभागा नदीच्या श्रीदत्त घाटावरील प्राचीन श्री दत्त मंदिरातील ब्रह्मा विष्णु आणि महेश यांचे चांदीचे मुखवटे अज्ञात चोरट्यांनी पळवून नेले. शहरात प्रसिद्ध असलेल्या श्री दत्त मंदिरातील चोरीच्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

श्री दत्ताच्या मुखवट्याची चोरी झाल्याचे आज सकाळी सहाच्या सुमारास तेथील पुजारी श्री वैद्य यांच्या लक्षात आले. चांदीच्या या तिन्ही मुखवट्याचे वजन सुमारे अडीच किलो होते. या चोरी प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे ही चोरी काल रात्री दीड ते आज पहाटे साडेचारच्या दरम्यान झाली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस निरीक्षक राजेश गवळी पुढील तपास करीत आहेत.

Web Title: god s silver statue stolen in pandhapur