"गोकुळ'ची सभा विधानसभा निवडणुकीनंतर 

"गोकुळ'ची सभा विधानसभा निवडणुकीनंतर 

कोल्हापूर - गेल्यावर्षी "मल्टिस्टेट' वरून गाजलेली कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) वार्षिक सर्वसाधारण सभा विधानसभा निवडणुकीनंतरच घेण्याचा निर्णय आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ऑक्‍टोंबरच्या शेवटच्या आठवड्यात ही सभा होईल, तारीख ठरवण्याचे अधिकार अध्यक्ष रविंद्र आपटे यांना देण्यात आले. 27 ऑक्‍टोंबरपासून दिवाळी असल्याने ही सभा 30 ऑक्‍टोंबरलाच होईल अशी शक्‍यता आहे. 

सहकार कायद्यानुसार सहकारी संस्थांना 30 सप्टेंबरपुर्वी सभा घ्यावी लागते. तथापि महापुराच्या पार्श्‍वभुमीवर राज्य शासनाने कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या सभांना 30 ऑक्‍टोंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. पण "गोकुळ' यापुर्वीच्या नियोजनात ही सभा 30 सप्टेंबर रोजीच ठेवली होती. विधानसभा निवडणुकीत संघाच्या संचालकांची उमेदवारांना गरज लागेल हा त्यामागचा उद्देश होता. पण काही संचालक निवडणुकीत उमेदवार किंवा प्रचारात असणार आहेत, त्यामुळे ही तारीख बदलावी अशी मागणी संचालकांतून होत होती. या पार्श्‍वभुमीवर आजच्या संचालक मंडळासमोर हा विषय ठेवण्यात आला होता. 

विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत सभा नको असाच सूर अनेक संचालकांनी आजच्या बैठकीत व्यक्त केला. त्यामुळे पुर्वनियोजित कार्यक्रमानुसार 30 सप्टेंबरची सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑक्‍टोंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही सभा घेण्याचे ठरले. तारीख ठरवण्याचे अधिकार श्री. आपटे यांना दिले असले तरी 27 सप्टेंबरपासून दिवाळी असल्याने 30 ऑक्‍टोंबरलाच ही सभा होईल. 

प्रचारात "गोकुळ'च केंद्रस्थानी 
अलीकडेच राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश, "गोकुळ' मल्टिस्टेटवर ठाम असलेले नेते व संचालक मंडळ यामुळे विधानसभेच्या प्रचारात अनेक मतदारसंघात "गोकुळ'च केंद्रस्थानी रहाणार हे निश्‍चित आहे. महाराष्ट्र शासनाने अजूनही या निर्णयाला हिरवा कंदील दिलेला नाही. आचारसंहितेपूर्वी हा निर्णय व्हावा यासाठी नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com