गोकुळ अध्यक्ष बदलासाठी १४ च्‍या बैठकीत खल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

कोल्हापूर - गोकुळचे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांना बदलण्यासाठी १४ डिसेंबरचा मुहूर्त काढला आहे. १७ पैकी १३ संचालकांनी बंड केल्याने नेते महादेवराव महाडिक व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांनी अध्यक्ष बदलाबाबतचा खल करण्यासाठी शुक्रवारी (ता. १४) बैठक बोलाविली आहे.

संचालकांच्या बंडाची बातमी ‘सकाळ’मधून बुधवारी (ता. ५) प्रसिद्ध झाल्यानंतर नेत्यांनी बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
विश्‍वास पाटील गेली साडेतीन ते पावणेचार वर्षे अध्यक्ष आहेत. प्रत्यक्षात त्यांना दोन वर्षेच संधी देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, त्यांनी राजीनामा न दिल्याने संचालक अस्वस्थ आहेत.

पाटील यांनी मुदतीत राजीनामा दिला असता, तर किमान दोन संचालकांना एक-एक वर्षे अध्यक्षपदाची संधी मिळाली असती. जवळपास चार वर्षे होत आल्याने एकाच संचालकाला अध्यक्ष होण्याची संधी मिळणार आहे. मात्र, पाटील राजीनामा देत नसल्याने ही संधीदेखील हुकणार की काय, अशी भीती संचालकांना वाटत आहे. त्यांनी पाटील यांना बदलण्यासाठी नेत्यांना वारंवार विनंती केली. अखेर अध्यक्ष पाटील यांना बदलण्यासाठी नेतेही उत्सुक नसल्याने अखेर संचालकांनी बंडाचा निर्णय घेतला. जर हा बदल झाला नाही तर कामकाजात सहभागी न होण्याचा इशारा दिल्याने, गोकुळ वर्तुळात एकच खळबळ उडाली. शुक्रवारी (ता. १४) होणाऱ्या बैठकीत पाटील यांचा राजीनामा व नव्या अध्यक्षाच्या नावावर शिक्‍कामोर्तब होणार आहे.

आगामी निवडणूक लक्ष्य
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अध्यक्षांची नियुक्‍ती होणार आहे. खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक व गोकुळचे नेते व पी. एन. पाटील रिंगणात असणार आहेत. या उमेदवारांचा विचार करून मग गोकुळ अध्यक्ष निवडीवर शिक्‍कामोर्तब होणार आहे.

संचालकांना अध्यक्ष होण्याची इच्छा असणे स्वाभाविक आहे. अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी राजीनामा देण्यास थोडा विलंब झाल्याने संचालक नाराज असले तरी ते सुज्ञ आहेत. संचालकांनी अध्यक्ष बदलाची मागणी केली आहे. त्यावर चर्चेसाठी शुक्रवारी (ता. १४) मी व पी. एन. पाटील बैठक घेऊ. संचालकांची भूमिका मात्र पेल्यातील वादळ असून, ते शांत होईल.
- महादेवराव महाडिक, 

गोकुळ संघाचे नेते

Web Title: Gokul President change issue