Gold Smuggling
sakal
सांगली - आसाममधील पोलिसांनी सोन्याच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल ५५ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे ३७ किलो २४ कॅरेट सोन्याची बिस्किटे जप्त केली आहेत. या प्रकरणात सांगली जिल्ह्यातील ३२ वर्षीय तरुणास अटक केली. तो दिघंची (ता. आटपाडी) येथील असल्याचे समजते आहे. त्याच्याकडून चार मोबाईल आणि १३ ग्रॅम चांदीही जप्त करण्यात आली.