Sangli: सांगली, कोल्हापुरात सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ; इस्लामपूरसह जयसिंगपूर, इचलकरंजीत चार तासांचा थरार

मुलीला क्लासला सोडून दुचाकीवरून घरी परतत असताना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावले. अर्धा तुकडा जमिनीवर पडला, उर्वरित घेऊन चोरटे पसार झाले. सकाळी साडेनऊला प्रकार घडला.
CCTV footage of chain snatching incident in Sangli; police intensify search operations.
CCTV footage of chain snatching incident in Sangli; police intensify search operations.Sakal
Updated on

सांगली, कोल्हापूर : लाल रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांनी चार तासांत सात ठिकाणी सोनसाखळी हिसकावण्याचा सपाटा लावला. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सांगलीमधून सुरू झालेला हा चोऱ्यांचा सिलसीला जयसिंगपूर, इचलकरंजी, हेरले, कसबा बावडा-कोल्हापूरनंतर इस्लामपुरात थांबला. यामुळे सांगलीसह कोल्हापूर पोलिसांचीही तारांबळ उडाली. संशयितांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले असून, त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com