सोने खरेदीतून साधला पाडव्याचा मुहूर्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

सातारा - वर्षाअखेर व महिनाअखेर असूनही साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गुंजभर तरी सोने घरात यावे, यासाठी साठवून ठेवलेल्या पैशातून सोने खरेदी करून पाडव्याचा मुहूर्त अनेकांनी साधला. सोन्याचा दर शंभर रुपयांनी कमी झाला होता. साताऱ्यात  २८ हजार ८०० रुपये दहा ग्रॅमचा दर राहिला. दिवसभर फारशी गर्दी नसली, तरी सायंकाळी सराफ पेठेत खरेदीसाठी गर्दी झाली होती.

मराठी वर्षारंभ म्हणजे गुढीपाडवा सण. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या मुहूर्तावर वस्तू खरेदीचा मोह कोणाला आवरणार नाही. मग महिना अखेर असो वा वर्षाअखेर गुंजभर सोने घरी आणले जातेच. आज दिवसभर सराफ पेठेत फारशी गर्दी जाणवली नसली, तरी सायंकाळी सराफ पेठ फुलून गेली होती. जेथे दहा ग्रॅम सोने घेतले जाते तेथे एक ते पाच ग्रॅम सोने घेऊन नागरिकांनी मुहूर्त साधला. आज सोन्याचा दरही शंभर रुपयांनी कमी होऊन २८ हजार ८०० रुपये इतका होता. लग्नासाठी सोने खरेदीची ऑर्डर दिलेल्यांनी आज मुहूर्तावर सोने घरी नेणे पसंत केले. त्यासाठी धनादेश किंवा स्वाइप मशिनचा वापर केला. रोख पैसे देऊन सोने खरेदी फारशी झाली नाही; पण ज्यांनी मुहूर्तावर सोने खरेदीचा निर्णय घेतला होता, त्यांनी आधीच बॅंकेतून पैसे आणून ठेवले होते. त्यानुसार आज मुहूर्तावर सोने खरेदी केली. दिवसभर फारशी गर्दी नसलेल्या सराफ दुकानात सायंकाळी मात्र गर्दी झाली होती. मोठ्या सराफ दुकानांत दुपारपासूनच ग्राहकांची रेलचेल होती.

पाडव्याला चोख सोन्याची सर्वाधिक खरेदी होते. महिनाअखेर व वर्षाअखेर असूनही ग्राहकांनी मुहूर्त साधत थोडी का होईना सोन्याची खरेदी केली. यात २४ कॅरेट शुद्ध सोन्याला अधिक मागणी होती. महिलांचा जुने दागिने मोडून नवीन दागिने घेण्याकडे कल राहिला. ज्वेलरी, नेकलेस, राणीहार, मंगळसूत्राचे नवीन प्रकाराला विशेष मागणी होती.
- दिलीप घोडके, घोडके ज्वेलर्स.

Web Title: gold purchasing padava muhurt