जावळीमध्ये भर वस्तीतील घर फोडून सुमारे 21 तोळे सोन्यावर डल्ला

bhilar
bhilar

भिलार - (ता.जावळी) येथे काल चोरट्यानी भर वस्तीतील घर फोडून सुमारे 21 तोळे सोन्यावर डल्ला मारला. 

याबाबत अधिक माहिती अशी की, काल रात्रीच्या सुमारास सर्वजण गाढ झोपले असल्याचा फायदा घेत महू गावातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या विठ्ठल मारुती गोळे यांच्या घराच्या मागच्या बाजूस असनारी कडी काढून चोरटयानी घरात प्रवेश केला. कसलाही आवाज न करता त्यानी घरातील लोखंडी ट्रांका, पेट्या उचलून घरामागील शेतात नेल्या व या पेट्याची कुलपे, कडी कोयंडे फोडून त्यातील किमती ऐवज, दागिने लंपास केले.

विशेष म्हणजे घराच्या बाहेरील बाजूस घरातील सर्वजण झोपले होते. परंतु चोरट्यानी प्रवेश केलेल्या दरवाजात असणारी लोखंडी पार, दरवाजाचा मोठा खिळा, लोखंडी पेट्या याचा आवाज झाला नाही. सकाळी उठल्यावर घर मालक विठ्ठल गोळे यांच्या हे लक्षात आल्यावर त्यांना धक्काच बसला. घरामागील बाजूस असणाऱ्या शेतात फोडलेल्या पेट्या व साहित्य अस्ताव्यस्त पडले आहे.

मेढा पोलिस ठाण्यात विठ्ठल गोळे यांच्या सुनबाई गोळे यांनी तक्रार दाखल केली आहे. घटनेची माहिती समजताच मेंढ्याचे पोलीस निरीक्षक जीवन माने, करहरचे श्री ओव्हाळ आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले व पाहणी केली. यावेळी माने यांनी श्वान पथकाला पाचारण केले आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com