साडेतीस लाखांचे सोने घेऊन कारागीर फरार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

तालुक्‍यातील सोनारांचा विश्‍वास संपादन करून सोने घेऊन त्यांच्या सांगण्याप्रमाणे दागिने बनवून देत होता. परंतु शुक्रवारी (ता. 11) पहाटे तो पळून गेल्याचे उघड झाले.

सांगोला - शहरातील 18 सोनारांचे एक किलो सोने घेऊन सोन्याचे दागिने बनवणारा कारागीर फरार झाला आहे. याप्रकरणी संशयित हबीब मोसियार मुल्ला याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 30 लाख 600 रुपये एवढी या सोन्याची किंमत आहे. या घटनेमुळे सराफ व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. 

संशयित मुल्ला (वय 35) हा मूळचा पश्‍चिम बंगालचा (रा. भोरमपूर, ता. श्रीरामपूर, जि. हुगळी) आहे. तो कोष्टी गल्ली जुन्या पोस्टामागे सरताज तांबोळी यांच्या घरात भाडोत्री राहत होता. 18 वर्षांपासून सोन्याचे दागिने बनवून देण्याचे काम तो करीत होता. तालुक्‍यातील सोनारांचा विश्‍वास संपादन करून सोने घेऊन त्यांच्या सांगण्याप्रमाणे दागिने बनवून देत होता. परंतु शुक्रवारी (ता. 11) पहाटे तो पळून गेल्याचे उघड झाले. त्याच्याविरुद्ध सराफ दुकानदार गुलाबराव मच्छिंद्र शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. त्याचा तपास सांगोला पोलिस करीत आहेत.

सांगोला येथील सोने गेलेले सराफ दुकानदाराचे नाव, कंसात गेलेले सोने ग्रॅममध्ये व त्यांची किंमत पुढीलप्रमाणे - गुलाबराव शिंदे (137 ग्रॅम) चार लाख 11 हजार, संतोष महामुनी (253 ग्रॅम), राजेंद्र वेदपाठक (153 ग्रॅम) सात लाख 59 हजार, संभाजी फाटे (30 ग्रॅम) 90 हजार, सुनील देवकते (42 ग्रॅम) एक लाख 26 हजार, प्रफुल्ल साळुंखे (41 ग्रॅम) एक लाख 23 हजार, सौरभ कदम (67 ग्रॅम) दोन लाख, दीपक यादव (15 ग्रॅम) 45 हजार, औदुंबर जाधव (17 ग्रॅम) 51 हजार, विजय भोसले (19 ग्रॅम) 57 हजार, महेश नलवडे (35 ग्रॅम) एक लाख पाच हजार, सूर्यकांत कदम (54 ग्रॅम) एक लाख 62 हजार, धनाजी चव्हाण (12 ग्रॅम) 36 हजार, बापू सरगर (10 ग्रॅम) 30 हजार, भाऊसाहेब गरंडे (20 ग्रॅम) 60 हजार, चंद्रकांत बाबर (38 ग्रॅम) एक लाख 14 हजार, सचिन माने (15 ग्रॅम) 45 हजार, विशाल शिंदे (25 ग्रॅम) 75 हजार. याशिवाय अजून काही सराफांचे सोने गेले असल्याची चर्चा आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: gold worker absconding with gold worth Rs 3 lakh 50 thousand